मालेगाव प्रतिनिधी जावेद.धन्नू भवानीवाले
वाशीम - दि :04 स्थानिक, स्व. लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्था वाशिम तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी ज्ञानदृष्टी कोचिंग क्लासेस मोप ता.रिसोड येथे किशोरवयीन मुलींकरिता 'कळी उमळताना' या विषयावर आरोग्य विषयक, शैक्षणिक, कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. वर्षा गायकवाड या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. वैशालीताई वाठोरे उपसरपंच ग्रामपंचायत वढव व कोलखेड , मोप येथील आरोग्य सेविका प्रियंकाताई खडसे मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून अंगणवाडी सेविका मालुताई मोरे , अंगणवाडी मदतनीस सौ. घायाळ ताई , संस्थेच्या सदस्या सौ.दुर्गाताई बाजड या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या सौ प्रियंका खडसे यांनी पीपीटी द्वारे मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन करत असताना किशोर वयामध्ये असणाऱ्या शारीरिक अडचणी व त्यावर मात कशी करायची, योग्य आहार तसेच सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना कशा पद्धतीने स्वतःला सवयी लावून घ्यायच्या. चांगले आणि वाईट यातील फरक कसा ओळखायचा, समाजातील वाईट नजरा पासून आपले संरक्षण कसे करावे या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या वाठोरे मॅडम यांनी मुलींकरिता असलेल्या वेगवेगळ्या कायद्या ची माहिती देत मुलींसाठी शासनाने प्रबळ कायदे केल्याचे सांगितले आहे. मुलींना न डगमगता शिक्षण घ्यावे व आपली ,आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. वर्षा गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतली व मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली त्यामुळे आज आपण शिक्षण घेऊ शकतो त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. किशोर वयातील मुलींनी या काळामध्ये स्वतःच्या शरीराची काळजी तर घेणे आवश्यक आहे त्यासोबतच मनाची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. कायद्याने मुलींना भरपूर संरक्षण दिलेले आहे परंतु आपण स्वतःवर नियंत्रण ठेवून पुढे गेले तर प्रगती करू शकतो असे मार्गदर्शन केले. या वयामध्ये आपल्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या आई-वडिलांशी आपण सांगितले पाहिजे अशी ही विनंती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी मयुरी आनंदा वाठोरे यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी नरवाडे व आभार प्रदर्शन वैष्णवी वाठोरे हिने केले. कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य महिला व मुली उपस्थित होत्या





Social Plugin