Ticker

6/recent/ticker-posts

सगरोळी येथे ग्रामदैवत शंभू महादेव मंदिराचे जिरणोध्दार शिवलिंग विरभंद्र मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्याचे



देगलूर --प्रतीनिधि- जावेद अहेमद 

 सगरोळी तालुका बिलोली येथे श्री श्री श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी केदार पीठ व सर्व शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत शंभू महादेव मंदिराचे जिरणोध्दार शिवलिंग वीरभद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळा दिनांक ३१.१.२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता आयोजित केले आहे

 दिनांक ३०.१.२०२५ रोजी सायंकाळी ४:०० श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी केदार पीठ व बसवलिंग शिवाचार्य महाराज जुकलकर शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज खतगावकर सिद्ध दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर शंकर लिंग शिवाचार्य महाराज हानेगावकर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर चंद्रशेखर महाराज देगलूरकर बसवलिंग शिवाचार्य महाराज कौलासकर राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आचार्य गुरुराज स्वामी अमदपुरकर सिद्धेश्वर महाराज सुकणीकर सिध्दायप्पा महाराज एकलारकर यांचे मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक निघेल व यानंतर सायंकाळी ७:०० वाजता प्रवचन होईल

 तसेच दिनांक ३१-१-२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता वरील सर्व गुरुवर्य यांच्या उपस्थितीत व श्री.श्री. १००८जगद्गुरु भीमाशंकर शिवाचार्य महास्वामी केदारपीठ यांच्या शुभहस्ते शंभू महादेव मंदिराचे व शिवलिंग वीरभद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलश रोहन सोहळा आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  महादेव मंदिर समिती समस्त गावकरी मंडळी सगरोळी यांच्याकडून करण्यात आले आहे