Ticker

6/recent/ticker-posts

योगासनामध्ये विसापूरचा अवनिश पाटील जिल्ह्यात अव्वल



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 स्व.यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धेत येथील विसापूर जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी अवनिश धनंजय पाटील याने योगासन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. सातारा येथील शाहू क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय बालक्रीडा स्पर्धेत योगासन प्रकारात अवनिश याने अतिशय सफाईदारपणे योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी प्रत्यक्ष योगासने पाहून अवनिशचे कौतुक केले.

गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, विस्ताराधिकारी संगिता गायकवाड, केंद्रप्रमुख बापूराव कुचेकर, विसापूरचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

यशस्वी विद्यार्थी अवनिश याला वर्गशिक्षक स्मिता शेळके, क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर धायगुडे, सरिता पाटील, मुख्याध्यापक लतिका कर्पे, वैशाली नांदे, शुभांगी चव्हाण,वैशाली जाधव, रेश्मा बोडरे यांचे मार्गदर्शन लाभले.