तीन वर्षांपासून गुंगारा : माण, फलटण, खटाव तालुक्यांत गुन्हे
बुध दि [प्रकाश राजेघाटगे] गेल्या तीन वर्षांपासून माण, फलटण आणि खटाव तालुक्यामध्ये गंभीर गुन्हा करून सतत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला रात्रीच्या वेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. तिसराकौन उर्फ सुधीर जाकर काळे (वय २१, रा. मोळ ता. खटाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा सुरू आहे. मध्यरात्री पुसेगावचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण व त्यांचे सहकारी यात्रेत गस्त घालत होते. तेव्हा दहिवडी पोलिस ठाण्यात मालमत्ता व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला माण, खटाव व फलटण भागातील पोलिसांना सातत्याने गुंगारा देऊन फरार झालेला तिसराकौन उर्फ सुधीर जाकर काळे याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. दहिवडी न्यायालयाचे त्याच्यावर पकड वॉरंट होते. पुढील कार्यवाहीसाठी त्याला दहिवडी पोलिसांच्या ताब्यात दिले. ..





Social Plugin