पुसेगावातील जिल्हा युवा महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
बुध दि. १ (प्रकाश राजेघाटगे-
श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित ११वा जिल्हास्तरीय युवा महोत्सवात समूहगीत प्रकारात पाटणच्या श्री स्वामी समर्थ युवा ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवला. कॉलेजमधील तरुणाईने आपल्या नृत्याविष्काराने रसिकांना जागीच खिळवून ठेवले होते. ठेका धरायला लावणारी गीते व लोकनृत्ये रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.. पाच कला प्रकारांत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपली कला सादर केली.. सदर कार्यक्रम स्पर्धेमध्ये पथनाट्य -१०, सुगम गायन-१३, समूहगीत-०८, लोकनृत्य लाईव्ह-०२, लोकनृत्य रेकॉर्ड-०९
इत्यादी संघाने भाग घेतला होता. या युवा महोत्सव स्पर्धामध्ये पथनाट्यामध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा यांना प्रथम क्रमांक मिळाला. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड यांना द्वितीय क्रमांक मिळाला आणि कलास्पंदन क्रिएशन पाटण या ग्रुपला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
सुगम गायन स्पर्धा:-श्री स्वामी समर्थ युवा ग्रुप पाटण यांना प्रथम क्रमांक मिळाला. श्री स्वामी समर्थ युवा ग्रुप कुसरुंड व म्युझिक वॉरिअर्स ग्रुप पाटण यांना विभागून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध व छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांना विभागून तृतीय क्रमांक मिळाला.
समूहगीत स्पर्धा:-श्री स्वामी समर्थ युवा ग्रुप कुसरुंड यांना प्रथम क्रमांक मिळाला तर म्युझिक वॉरिअर्स ग्रुप पाटण यांना द्वितीय क्रमांक मिळाला आणि छोटे शूरवर ग्रुप पाटण यांना तृतीय क्रमांक मिळाला.
लोकनृत्य लाईव्ह:-मधोजी कॉलेज फलटण यांना प्रथम क्रमांक मिळाला तर कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव यांना द्वितीय क्रमांक मिळाला. लोकनृत्य रेकॉर्ड स्पर्धा:-सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा यांना प्रथम क्रमांक मिळाला तर आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा व मुधोजी कॉलेज फलटण यांना द्वितीय क्रमांक विभागून मिळाला. आणि अनुष्का कला ग्रुप वाई व यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड यांना तृतीय क्रमांक मिळाला.
सानिका भागवत सोलापूर ,प्रा.प्रफुल्ल कांबळे-लोणंद, अनंत साठे [ पुणे ] , प्रा काटकर [ कराड ] गोंजारी यांनी परिक्षक म्हणून काम केले विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ . सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सपोनि संदिप पोमण , उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव , युवा महोत्सव समितीचे सचिव प्रा . संजय क्षिरसागर, प्रभारी प्राचार्य डॉ . राजेंद्र भोसले , प्राचार्य दत्तात्रय गोफणे ., मुख्याध्यापक अशोक सावंत , मुख्याध्यापिका हेमलता देशमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.





Social Plugin