Ticker

6/recent/ticker-posts

प्रकल्पग्रस्तांचा महामेळावा



 प्रतिनिधी -संजय भरदुक मंपिर 

 १९ जानेवारीला वाशिम येथे श्री तुळशीराम जाधव महाविद्यालय सोनखास रोड, लाखाळा वाशिम येथे सकाळी ११ वाजता प्रथम प्रकल्पग्रस्त महिलाव पुरुष यांचा महामेळावा, खासदार,आमदार व मान्यवरांचा सत्कार , तसेच महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . तरी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष व विभागीय कार्याध्यक्ष श्री माणिकराव गंगावणे सर यांनी केले आहे.या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य आमदार महंत धर्मगुरू बाबुसिंगजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी सत्कारमूर्ती खासदार श्री संजयभाऊ देशमुख, आमदार भावनाताई गवळी, आमदार श्री श्यामभाऊ खोडे, आमदार सईताई डहाके, आमदार श्री अमीतभाऊ झनक, आमदार श्री किरण भाऊ सरनाईक, जिल्हाधिकारी भुवनेश्वरी ताई एस. माजी आमदार ऍड.श्री विजयराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री चंद्रकांतजी ठाकरे, श्री अमोल पाटणकर, सुरेशभाऊ लुंगे, रत्नप्रभा घुगे,माधवराव अंभोरे, अर्चना खोरणे, हेमंत चव्हाण साहेब,यांची उपस्थिती राहणार आहे.या महामेळाव्यात प्रकल्पग्रस्त पुरुष महिला यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्न , अडीअडचणी उहापोह करण्यात येणार आहे तरी या अडचणी उपस्थित मान्यवरांच्या संयुक्त प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटू शकणार आहे.याकडे जिल्हा वाशीयांचे लक्ष लागले आहे.