मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड येथे केले प्रतिनिधित्व"मानवविद्या भाषा व कला या प्रकारात प्रथम १० विद्यार्थ्यामध्ये येण्याचा बहूमान मिळवला
वाशिम ; स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम येथील प्रा. पंढरी गोरे यांनी रायगड येथे झालेल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेमध्ये सहभाग घेतला व मानवविद्या भाषा व कला या प्रकारात प्रथम दहा विद्यार्थ्यामध्ये येण्याचा बहूमान मिळवला. या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बत्तीस लाख विद्यार्थीमधून 26 विद्यापीठाचे 777 प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये पोस्ट पीजी प्रकारात फक्त दोन विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर केली जाते. त्यामध्ये अनुक्रमे मुंबई प्रथम व सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेमध्ये झालेल्या प्रथम राउंड मध्ये योग्य पोस्टर सादर करून पंढरी गोरे यांनी कृषी सक्षमीकरन करण्यामध्ये सीएसआर ची आवश्यकता विषद केली. त्यांनी आपल्या सादरीकरनामध्ये सांगितले कि, भारत हा कृषिप्रधान देश आहे. व महाराष्ट्र हे विकसित राज्य समजल्या जाते परंतु भारतातील सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्रात व प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा भागामध्ये होतात. विदर्भ भाग व यवतमाळ जिल्याची ओळख आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा जिल्हा अशी आहे.
कृषिप्रधान देशामध्ये शेतकरी आत्महत्या व शेतकरी प्रश्नाकडे शासनाचे लक्ष आपल्या संशोधनातून त्यांनी मांडले. उत्पादनाला हमी भाव न मिळणे, भांडवल निर्मिती करण्यामध्ये सक्षम नसणे, अनियमित पाऊस, ग्लोबल वर्मिंग, यासारख्या समस्याने शेतकरी ग्रस्त आहे. शासन काही प्रमाणात समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु हे प्रयत्न पुरेसे नाही त्यामुळे कॉर्पोरेट यांनी सामोरे येऊन शेतीतील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण 2013 च्या कंपनी कायद्यानुसार ज्या कंपन्याचा सरासरी निव्व्ल नफा 5 कोटी किंवा त्यापैक्षा जास्त आहे त्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून समाजकार्य करण्यासाठी खर्च करावा लागतो. परंतु कृषिप्रधान देशामध्ये जो कायदा तयार केला आहे त्यामध्ये जी 11 विषयाची यादी दिली आहे त्यामध्ये कृषी या घटकाचा समावेश नाही. ग्रामीण विकास या घटकाअंतर्गत हा खर्च अत्यल्प आहे. कृषी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारतातील 140 कोटी लोकसंख्या अन्नधान्य साठी शेतीवर अवलंबून आहे.ग्रामीण भागातील 70 लोक अन्नधान्य सोबतच आपली उपजीविका कृषितून पूर्ण करतात. कृषी क्षेत्रामध्ये इतर क्षेत्राच्या तुलनेत जास्त रोजगार देण्याची क्षमता आहे. जवळपास 55% रोजगार हे कृषी व कृषिपूरक व्यवसायातून निर्माण होतात. शास्वत विकास साध्य करायचा असेल व भारत देशाचे विकसित भारत होणायचे स्वप्न 2047 पर्यंत पूर्ण करायचे असेल तर उद्योजकच्या सामाजिक जवाबदारी (सीएसआर ) चा निधी कॉर्पोरेट यांनी शेती क्षेत्रामध्ये करणे गरजेचे आहे. ज्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होतील, वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्य याची सोय होईल. गरिबी कमी होण्यास मदत होईल, ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल.
शेतकऱ्याचे सक्षमिकरण झाले तर तो आपल्या शिक्षण व कुटुंब सदस्यांचे पालणपोषण, लग्न, यासारख्या गोष्टी सहज करू शकेल त्यामुळे कुठलाही शेतकरी या कृषिप्रधान देशामध्ये आत्महत्या करणार नाही. आत्महत्यामुक्त भारतासाठी व उन्नत विकासाठी कॉर्पोरेट यांनी कृषिक्षेत्रात उद्योजकच्या सामाजिक जवाबदारीचे उपक्रम वाढवा असे भावनिक आव्हान त्यांनी आपल्या संशोधनातून केले आहे. तरच अन्नदाता सुखी भव : या म्हणीचे सार्थक होईल. प्रा पंढरी गोरे हे गुलाम नबी आझाद समाजकार्य येथील पीएचडी चे संशोधक विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या मार्गदर्शक प्रा. डॉ. विवेक सिरस्कार, अविस्कार मार्गदर्शक डॉ. भालचंद्र देशमुख, संशोधन केंद्र प्रमुख डॉ. राजेश काळे. यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन केले आहे. त्यांच्या यशाबद्दल श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय विकास समिती अध्यक डॉ. स्नेहदीप किरणराव सरनाईक आणि प्राचार्य डॉ संजय साळीवकर, प्रा. संजय साळवे, प्रा. किशोर वहाणे, डॉ. वसंत राठोड, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.





Social Plugin