मालेगाव प्रतिनिधी जावेद भवानीवाले
मालेगाव दि :18/01/2025 मालेगांव नगरपंचायत हद्दितील शेलु फाटा ते ना ना मुंदडा तज्ञ विद्यालय आणि हिंदु मोक्षधाम परिसरातील मास विक्रि कायमस्वरूपी बंद करावे.कारण नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत असून समाज मनावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच शाळेतील लहान मुलांवर चांगले विचार व संस्कार पडण्यासाठी व शेलु फाटा ते शिरपूर जैन मंदिराच्या रस्त्यावर श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर स्थित आहे. हे मंदिर मालेगांव जैन समाजासाठी अत्यंत पवित्र आणि आदरणीय आहे. येथे नियमितपणे भक्तगण, जैन संप्रदायाचे साधू-संत, मुनिश्री, माताजी इत्यादी दर्शनासाठी जातात. तसेच, जवळच मोठे विद्यालय असून शाळेतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी या रस्त्यावरून जातात. पण, या रस्त्यावर मास विक्रीची दुकाने लावली गेली आहेत, ज्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शाळेतील विद्यार्थी, महिला, पुरुष भक्तगण, तसेच जैन संप्रदायाचे अनुयायी मासाच्या विक्रीच्या दुकांन्यांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. मासाच्या विक्रीचा वास, कापलेले मास, पाळीव प्राणी, त्यांचे तुकडे इतरत्र नेत असल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तर दुसरीकडे, हिंदू स्मशानभूमी रोडवर मास विक्री केल्याने दुर्गंधी पसरतू, तर आणि अनेक वेळा पक्षी मासाचे तुकडे उचलून मोक्षधाम परिसरात फेकतात, ज्यामुळे अत्यंत दुर्गंधी वास पसरतो. यामुळे त्या परिसरात जाणाऱ्यांना त्रास होतो. तरी नगरपंचायतीने या रस्त्यावरील मास विक्रीच्या दुकांनांना कायमस्वरूपी बंद करावे आणि त्या दुकानदारांना इतर ठिकाणी विक्री करण्यासाठी उपयुक्त जागा उपलब्ध करून द्यावे. तरी या मागणीचा गंभीरतेने विचार करावा दि. २० जानेवारी पर्यंत कार्यवाही करावी. अन्यथा आम्हाला इतर मार्गाने आंदोलन करावे लागेल.असे विनोद (लकी) रोकडे श्री दिगंबर जैन ग्लोबल महासभा जिल्हाध्यक्ष वाशिम यांनी मालेगांव नगरपंचायत मुख्याधिकारी पंकज सोनुने यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





Social Plugin