मालेगाव प्रतिनिधी: -जावेद धन्नू भवानीवाले
देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंती स्थानिक नगरपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली .
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्य अधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा प्रचार करण्याचा संकल्प केला नगरपंचायतचे मुख्याधिकारी पंकज सोनुने यांनी सावित्रीबाईंच्या समाज सुधारणेच्या त्यांच्या कार्यावर व महत्त्वाच्या योगदाना वर प्रकाश टाकत, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. "सावित्रीबाईंचे विचार आजही समाज बदलण्यास प्रेरणा देतात," असे सोनुने यांनी सांगीतले कार्यक्रमास नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक,तसेच समाज सेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला उपस्थित सर्वांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला वंदन करून त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. सावित्रीबाईं फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, नगरपंचायतीने पुढील काळात महिलांच्या शिक्षणासाठी विशेष योजना राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे.





Social Plugin