Ticker

6/recent/ticker-posts

माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे इयत्ता 12 वी चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न



कृष्णा पवार@ग्रामीण प्रतिनीधी नाशिक

सुरगाणा दिं८ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे आज दिनांक 08/02/2025 रोजी इयत्ता 12 वी चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आजच्या या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मा.प्राचार्या श्रीमती जे.पी.पवार मॅडम या होत्या. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच सर्व शिक्षक,विद्यार्थी यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती ,आपल्या डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर, आरोग्यदूत व डांग मंडळ मंडळ नाशिक संस्थेचे माजी सचिव स्व.डॉ. विजयजी बिडकर साहेब यांच्या प्रतिमेचे पुष्प फुलांनी पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पेन व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. आजच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.एस.टी. बागुल यांनी केले.

तर विद्यार्थ्यांमधून मयुरी निरभवणे,निशा जाधव,साहिल दौंड,प्रियंका महाले, रविना गावित, व प्रथमेश पालवी यांनी मनोगत व्यक्त केले.शिक्षकांमधून श्री.एन. बी अहिरे, श्री.आर.टी. गावित श्री.एम.एच.बागुल श्री.एस.यु.भोये व श्रीम.सी.बी.महाले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला कसे समोरे जावे, अभ्यास कसा करावा,ताण तणाव विरहित परीक्षा कशी द्यावी,तसेस इयत्ता 12 वी नंतर आपण विविध नवनवीन क्षेत्रात प्रवेश घेऊन आपले जीवन यशस्वी बनविण्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले.प्राचार्या श्रीमती जे.पी.पवार मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात् .विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेतून विद्यालयास 3 बादल्या, 5 डजबीन, 5 सुपल्या व 3 झाडू अशा वस्तू भेट दिल्यात.आजच्या या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी.चंदना जाधव व जयश्री भोये यांनी केले.तर उपस्थितांचे आभार श्री.व्ही.के.भोंडवे यांनी मानले. आजच्या या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.