आमदार सईताई डहाके व श्यामजी खोडे यांची उपस्थिती
गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
कारंजा : येथील श्री नृसिंह सरस्वती FC स्वामी महाराज संस्थानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका ८ फेब्रुवारीपासून जणसेवेत रुजू झाली आहे. आमदार सईताई डहाके व आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पार पडले.
तत्पूर्वी, आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार सईताई डहाके, आमदार श्यामभाऊ खोडे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, दत्तराज डहाके , संस्थानचे अध्यक्ष विनायक सोनटक्के, कोषाध्यक्ष अभय पारसकर, कृष्णाशास्त्री आर्विकर, डॉ.शार्दुल डोणगावकर, डॉ.अजय कांत, सचिन कुलकर्णी, निलेश सोमाणी आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. खोडे यांनी रस्ते चांगले झाल्याने वाहनांच्या धावण्याचा वेग वाढला आहे. परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढल्याने अत्याधुनिक रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. गुरुमंदिर संस्थांच्या या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना लाभ होईल, असे मत त्यांनी
व्यक्त केले. आ.डहाके यांनी गुरुमंदिर संस्थानचे आरोग्य व सामाजिक सेवेत आजवर उल्लेखनीय योगदान राहिले आहे असे बोलून त्यांनी गुरुमंदिर संस्थानचा विकास आराखडा लवकरच मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला. शिवाय त्यासाठी आपल्याकडून प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष गोलेछा, डॉ.कांत , आर्विकर शास्त्री आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रकाश घुडे तर सूत्रसंचालन प्रसन्न पळसकर यांनी केले. कार्यक्रमाला संस्थानचे विश्वस्त अविनाशजी खेडकर निलेशजी घुडे, रमेश देशमुख यांच्यासह इतर उपस्थित होते.





Social Plugin