Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव वार्ड क्र.17 मधील अंगणवाडीत शिवजयंती साजरी



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

       मालेगाव:- ता.१९वार्ड क्रं 17 चर्च समोरील अंगणवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. 

     अंगणवाडी तील चिमुकल्या बालकांना छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख निर्माण व्हावी. म्हणून अंगणवाडी सेविका सविता शेजुळ यांनी जयंतीचे आयोजन केले होते.सेजुळ यांनी राजमाता जिजाऊ यांनी आपल्या मुलाला एक आदर्श स्वराज्य रक्षक बनविले.छत्रपतींनी आपल्या कर्तुत्वाने स्वराज्य निर्माण केले .त्याचप्रमाणे उपस्थित मातांनी आपल्या मुलांवर छत्रपती सारखे संस्कार घडविण्याचे आवाहन केले.

यावेळी वनिता भुसारी आशा ,यांनी शिवबाचा पोवाडा गायला. भारती दाभाडे यांनी शिवबा विषयी मार्गदर्शन केले. अंगणवाडीतील चिमुकल्यांनी शिवाजी महाराजांच्या वेशभूषामध्ये शिवतेज भुसारी व जिजामाता यांच्या वेशभूषा मध्ये एकता दाभाडे, विद्या भुसारी, अन्वी वानखडे यांनी वेशभूषा केली होती .कार्यक्रमाला अंगणवाडी कार्यक्षेत्रातल्या महिला व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला पुष्पा सोनवणे अंगणवाडी मदतनीस, सुरेखा निकाळजे आशा, वनिता भुसारी आशा ज्योती अंभोरे, भारती दाभाडे राणी भुसारी मनीषा खिल्लारे,सावळे बाई , शोभाबाई अंभोरे, प्रज्ञा कांबळे यांसह महिला व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.