Ticker

6/recent/ticker-posts

राहेरी बु आंगनवाड़ी क्रं 2 शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती साजरी



सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा :-   राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आसता  प्रथमच सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी बु येथिल आंगनवाड़ी क्रं 2 शाळेमध्ये केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवरायांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली.

शिवजयंती निमित्त आंगनवाड़ी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी अंगणवाडीतील बालकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती समजवून  त्यांच्या बालमनावर महाराजांच्या कार्याचे संस्कार व्हावे, याकरिता अंगणवाड्यांमध्येही मोठ्या थाटामध्ये शिवजयंती उत्साहात जयंती साजरी करण्यात आली

दरम्यान, बालकांना शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी सांगण्यात आल्या तसेच राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत कु . स्वरा दत्तात्रय देशमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत दुर्गेश ज्ञानेश्वर तिकटे ,आर्या समाधान गवई  परिधान करण्यात आले. अनुषांगिक उपस्थित ग्रां सरपंच पति बालाजी देशमुख ग्रां.उपसरपंच कोकीळ ताई गवई ,ग्रां. सदस्य जयश्री ताई देशमुख, आंगनवाड़ी सेविका  अंतकला जाधव सविता देशमुख आलका देशमुख सुनिता देशमुख  निम्रला सोनूने आंगनवाड़ी मदतनीस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली