Ticker

6/recent/ticker-posts

मेडशी येथील सुप्रसिद्ध हॉटेल सरपंच येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी



मालेगाव प्रतिनिधी  जावेद धन्नू भवानीवाले 


मेडशी दि:19फेब्रु 2025 रोजी लोककल्याणकारी राजे,बहुजन प्रतिपालक, रयतेचे दुःख दूर करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारी जयंती दिनानिमित्त मेडशी येथील सुप्रसिद्ध सरपंच हॉटेल येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला

छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्याना सोबत घेऊन खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन काळात जातीभेद नव्हता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई विशिष्ट धर्माविषयी नसून अन्याय व अत्याचार करणाऱ्या विरोधात होती रयतेच्या गवताच्या काडीलाही त्याच्या अनुमतीशिवाय हात न लावण्याची ताकीद छत्रपतींनी आपल्या सैनिक व मंत्रिमंडळाला दिली होती महिलांचा सन्मान खऱ्या अर्थाने शिवरायांनीच आम्हाला शिकविला त्यामुळे अशा आदर्श राजा पुन्हा जन्माला येणार नाही.कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करून रयतेचं स्वराज्य स्थापन केलं आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवत त्यांनी अटकेपार झेंडा फडकवण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत आणि ताकद महाराष्ट्राला दिली. अशा महान राजाला मानाचा मुजरा देऊन 

 सरपंच हॉटेलचे ओनर शेख जाकीर शेख गणी बागवान , व त्यांच्या संपूर्ण हॉटेलस्टॉप ने एकतेचे संदेश देत आनंदात शिवजयंती साजरी