Ticker

6/recent/ticker-posts

दत्तात्रय मिरजकर पतसंस्थेतर्फे महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ


 

संदिप गावडे @ प्रतिनिधी

        येथील दत्तात्रय मिरजकर (आण्णा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मकर संक्रातीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ घेऊन महिलांना हळदीकुंकू व तिळगुळ वाटप करुन संक्रातीचे वाण भेट म्हणून देण्यात आले. 

         यावेळी वाळवा पंचायत समितीच्या माजी उपसभापती भाग्यश्रीताई शिंदे, विद्याताई शिंदे, माजी नगराध्यक्षा झिनत आत्तार, नगरसेविका पुष्पलता माळी, मंगल सिद्ध , मनीषा जाधव , शारदा खोत , जायंट्स ग्रुपच्या महिला अध्यक्षा दमयंती इंगळे प्रमुख उपस्थित होत्या. 

     महिलांना एकत्र येऊन एक दिवसाचा विरंगुळा मिळावा, आपल्या विचारांचे देवाण-घेवाण व्हावे. यासाठी अशा कार्यक्रमांचे आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भाग्यश्री ताई शिंदे यांनी केले. 

    संस्था तसेच महिला सभासद यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेचे संस्थापक संचालक प्रकाश शिंदे - मिरजकर यांनी सांगितले. या हळदी कुंकू समारंभास जवळपास ५०० महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला. 

       यावेळी संस्थेच्या प्रमिला शिंदे-मिरजकर, व्हा . चेअरमन, अश्विनी शिंदे, जयश्री हिरुगडे, महिला सल्लागार समिती अध्यक्षा वैशाली डफळे, उपाध्यक्षा वैशाली पाटील , सारिका शिंदे , शुभांगी कदम , वर्षा देसावळे , स्नेहल शिंदे , सुलभा आटुगडे , शोभा शिंदे , मोनिका घबक , पल्लवी शेळके , नंदा गायकवाड , स्वाती हिरुगडे , सुजाता यादव आदींनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा लांडे तर स्वागत व प्रास्ताविक वैशाली डफळे यांनी केले. तसेच स्नेहल शिंदे यांनी आभार मानले.