सुलतानपूर/प्रतिनिधी इमरान शेख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अज्ञात व्यक्तीने 3 फेब्रुवारी 2025 रोज सोमवारला रात्री धम्मचक्र अंकित असलेला निळा ध्वज उभारलेला आहे. ही घटना सकाळी उघडकीस आल्याबरोबर मोठ्या संख्येने बौद्ध बांधव तसेच गावकरी या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच फार मोठा फौज फाट्यासह पोलीस प्रशासन अधिकारी आणि तहसील चे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होऊन या ध्वजाच्या संदर्भात चर्चा करून हा विषय सामांजसपणाने मिटविण्याचा प्रयत्न केला आणि हा ध्वज आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आला. अनेक बौद्ध बांधव तसेच गावकरी आणि पोलीस अधिकारी तसेच तहसील अधिकारी यांच्यात चर्चा होऊन बौद्ध बांधवांनी लेखी आश्वासन दिले की या ठिकाणी असलेल्या ध्वजाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास आम्ही जबाबदार राहू तुमच्यापर्यंत कोणत्याही प्रकारची आमची तक्रार येणार नाही.
अशा प्रकारचे एक पत्र लिहून पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासन यांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे.यावेळी जिल्हा उपनिरीक्षक बुलढाणा बी बी महामुनी, डी वाय एस पी प्रदीप पाटील, एसडीओ मेहकर रवींद्र जोगी साहेब, मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे साहेब, बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील,डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर नागरे,लोणार तसिलदार भूषण पाटील,नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे,सुलतानपूर तलाठी संतोष पनाड,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गजानन कावरके,हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार,हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव,खूपिया पोलीस विजय बेंडवाल,खुपिया पोलीस संतोष चव्हाण,सुनील नागरे तसेच गावकरी संघपाल नागवंशी पनाड, महेंद्र पनाड,अनित्य गेवंदे,तंटामुक्ती अध्यक्ष राजेश पिंपरकर,पोलीस पाटील पती राजेश भानापुरे, स्टार ग्रुपचे अध्यक्ष शेख अख्तर भाई, शेख राजिक ,ग्रा.प. सदस्य अमीर भाई, सद्दाम भाई ,पत्रकार अबुतालिब खान,अनित्य घेवंदे ,अनिल ठाकरे, डॉक्टर रामेश्वर कडुकर इत्यादी अशी अनेक गावकरी मंडळी बौद्ध बांधव तसेच महिला मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उपस्थित होऊन यांच्यामध्ये या ठिकाणी ध्वजाला जसा आहे तसाच ठेवून विषयाला लेखी स्वरुपात करार करून स्थगिती देण्यात आली





Social Plugin