Ticker

6/recent/ticker-posts

आष्टा दक्षिणभाग सोसायटीच्या संचालकपदी रंगराव मेथे यांची निवड



संदिप गावडे @ आष्टा प्रतिनिधी 

      येथील शतकपूर्ती आष्टा दक्षिणभाग विकास सोसायटीमध्ये स्विकृत संचालक म्हणून येथील प्रगतशील शेतकरी रंगराव राजाराम मेथे यांची निवड करण्यात आली. 

             आष्टा शहरात सहकार व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय नावलौकिक असलेल्या आष्टा दक्षिण भाग विकास सोसायटीची यशस्वी घोडदौड सुरु आहे. अशा संस्थेच्या संचालकपदी रंगराव मेथे यांच्या सारख्या सर्व सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याची निवड झाल्याने संचालक मंडळाचे तसेच रंगराव मेथे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

         आष्टा शहराचे माजी नगराध्यक्ष कै. बाबासाहेब ढोले (आप्पा) यांचे ते निकटवर्तीय तसेच आदरणीय जयंतराव पाटील यांचे निष्ठावंत समर्थक म्हणून रंगराव मेथे व कुटुंबियांची ओळख शहरात आहे. त्याचबरोबर रंगराव मेथे यांचे चिरंजीव सुहास मेथे यांनी देखील आ. जयंतराव पाटील व युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आष्टा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदी काम करीत असताना युवकांची संघटना बांधली आहे. 

       यावेळी बोलताना सुहास मेथे म्हणाले, गेल्या तीन पिढ्या आमचे कुटुंब माननीय जयंत पाटील साहेब यांच्याशी एकनिष्ठ आहोत. युवा नेतृत्व प्रतिकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मला काम करीत असताना सामाजिक कार्यावर भर दिला आहे. आमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबाला सोसायटीचे संचालकपदी संधी दिल्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. 

       सोसायटीचे चेअरमन पोपट शेळके, संचालक शिवाजी ढोले (आबा), जगन्नाथ मस्के (आण्णा), मोहनमामा गायकवाड, किरण काळोखे, विकास बोरकर, युवा नेते अमित ढोले, दत्तात्रय मस्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी आनंदराव मेथे,सुभाष मेथे,अनिल मेथे,लालासो मेथे,संदिप कदम,मनोज मेथे,निवास मेथे,वृषभ यादव,विजय हळदे,आकाश मेथे,सौरभ मेथे,सार्थक मेथे,अमित मेथे,व मराठा युवा संघटनेच सर्व सदस्य तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. 

 One attachment