Ticker

6/recent/ticker-posts

आष्टा येथील पुरातन गणपती मंदिरात श्री गणेश मुर्तीचा वज्रलेप व प्राणप्रतिष्ठा तसेच गणेश जन्मकाळ सोहळा उत्साहात



 संदिप गावडे @आष्टा प्रतिनिधी 

        आष्ट्याचे आराध्यदैवत श्री गणपती देवालयात श्री गणेश मूर्तीचा वज्रलेप पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. त्याचबरोबर श्री गणेश जयंतीनिमित्त गणेश जन्मकाळ सोहळाही मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. 

         येथील गणपती देवालय मंदिराच्या पुनर्निर्माण करण्याचे 'श्री गणपती देवालय ट्रस्टच्या' वतीने आयोजन करण्यात आले. यानुसार या योजनेचे कार्य विघ्नहर्ता श्री गणेश मूर्तीच्या वज्रलेपाने दि. २२ डिसेंबर २०२४ पासून प्रारंभ झाला. त्यावेळी सर्व गणेश भक्तांना शेंदुर लेपनासह मूळ मूर्तीचे दर्शनानंतर दि. २३ डिसेंबर पासून प्रत्यक्ष वज्रलेपाचे कार्य चालू केले ते दि. ३० जानेवारी २५ पर्यंत पूर्ण झाले. त्यानंतर श्री मूर्तीवरील शेंदूर व रंगाचे थर दूर होऊन मूळ गणेशाचे दर्शन भाविकांना होणार होते. 

         त्यानुसार दि. ३१ जानेवारी रोजी श्रीची प्राणप्रतिष्ठा, श्री गणेश याग व महाआरती नंतर भाविकांना श्री मूर्ती चे दर्शन झाले. तसेच शनिवारी दि. १ फेब्रुवारी रोजी ह.भ‌.प. श्री सुनिलबुवा काणे यांचे सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रमानंतर दुपारी १२ वाजता गणेश जयंती पुष्पकाळ चा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी असंख्य गणेश भाविक व भक्त उपस्थित होते.