Ticker

6/recent/ticker-posts

आष्ट्यात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करावा : दलित महासंघ



संदिप गावडे @ प्रतिनिधी 

         आष्टा शहरात लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा. या मागणीसाठी दलित महासंघ (वायदंडे गट) यांच्या वतीने अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना निवेदन देण्यात आले.  

         यावेळी दलित महासंघाचे आष्टा शहर उपाध्यक्ष अमोल लोखंडे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील आहे. पण वाळवा तालुक्यात कुठेही लोकशाही डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला नाही, ही खेदजनक बाब आहे. आष्टा शहरात अण्णाभाऊंवर प्रेम करणारा समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचे काम आष्टा शहरातून सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

     शिवाय नगरपरिषद प्रशासन व महसूल प्रशासन यांनी पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. सदर जागेत सुशोभिकरण करून बगीचा बांधकाम करण्यात यावे. यासह अन्य मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. अन्यथा यासाठी दलित महासंघ वायदंडे गटाच्या माध्यमातून व्यापक आंदोलनाचा लढा उभा करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 

        यावेळी दलित महासंघ वायदंडे गटाचे आष्टा शहर उपाध्यक्ष अमोल लोखंडे, महेश घस्ते, अक्षय औघडे, विनोद कोळी, छत्रपती कुरणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.