Ticker

6/recent/ticker-posts

शिवजयंती व उरुसा निमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी व सल्ला



पाटण (दिनकर वाईकर) 

किरकोळ  दुखणे व आजारपण महिलांनी अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे मुले मुली वयात येताना आपण त्यांना जाणून घेणे महत्त्वाचे आहे व त्यांच्याकडे लक्ष द्या तसेच महिलांनीही मला काहीच होत नाही असे न करता डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे शिवजयंती व उरसानिमित्त पुणे वाले उर्स  कमिटीने उर्स निमित्त हजरत खलील चिस्ती यांनी महिला आरोग्य शिबिर आयोजित केले होते यावेळी डॉक्टर संगीता यादव यांनी महिलांना आरोग्यविषयक सल्ला दिला

यावेळी कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती डॉक्टर संगीता यादव स्त्री रोग तज्ञ डॉक्टर नागेश्वर ननावरे पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष अनिता देवकांत श्वेता वाघमारे शिवसेना तालुकाप्रमुख ऍड पाटील नगरसेविका यांची उपस्थिती होती

डाँ, यादव पुढे बोलताना मुलगा आणि मुलगी फरक करू नका   वयानुसार वाढ होताना अनेक बदल घडत असतात 13 ते 14 वर्षापासून अनेक बदल घडत असतात मुलांच्या वाडी कडे दुर्लक्ष करू नका अंतर्गत बदल घडत असतात बधला कडे लक्ष द्या हार्मोन्स बदल उघड दिसत नाहीत परंतु अंतर्गत बदलाकडे  दुर्लक्ष करू नका आत्ताचा जमाना वेगवान आहे अपुऱ्या वयात नको ते ज्ञान मिळत आहे मोबाईल हा घातक आहे  ठराविक वेळेत बदल घडले पाहिजेत मासिक पाळीच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत मुली वयात येताना लक्ष देणे गरजेचे आहे डॉक्टर च्य संपर्कात राहिले पाहिजे बालपण किशोरवयीन व प्रजनन या स्तरातून आपणास जावे लागते मासिक पाळी योग्य वयात आली पाहिजे आणि उशिरा ही येऊ नये अल्पवयीन मुला मुलीची  लग्न झाले तर पुन्हा मूल होण्यास त्रास सहन करावा लागतो लग्नाचे वय योग्य असावे मुल होण्याची ही   ठरावीक वेळ असते महिला वर्ग आपल्या आरोग्यास तक्रारी अंगावर  काढतात महिलांमध्ये अंगावर जाणे ही समस्या दिसून येते याचा योग्य सल्ला घेणे उपचार घेणे गरजेचे आहे अंगावरून लाल पांढरे  जाते हे कोणाला सहसा सांगत नाही पाळीचा रक्त स्त्राव  किती प्रमाणात असावा हेदेखील तपासले गरजेचे आहे आपले पुढचे आयुष्य एका साध्या चुकीमुळे वाया  जाऊ  शकते महिलांना काही त्रास होत असेल तर वेळच उपचार करून घ्या महिलांच्या तक्रारी दिवसभर न संपण्यासारखे आहे आपण मोकळे झाले पाहिजे खुला संवाद साधून तक्रारीचे निवारण  करा आणि आपला आयुष्य सुंदर बनवा असे आवाहन यांनी केले

अँड, पाटील बोलताना  म्हणाले महिलांनीआपल्या आरोग्याची  काळजी घेताना मनाच्या आरोग्याची ही काळजी घ्यावी महिलांना अनेक कायदे नियम आहेत आपल्याला अधिकार प्राप्त आहे म्हणून त्याचा गैरवापर करू नका महिलांनी किमान कायद्याचे थोडेफार ज्ञान जाणून घ्या असे सांगितले तपासणी मोफत मार्गदर्शन शिबिरात पाटण सह   परिसरातील महिलांनी तपासणी व सल्ला शिबिराचा लाभ घेतला