संदिप गावडे @ आष्टा प्रतिनिधी
आष्टा येथील विविध ठिकठिकाणी छापे टाकून शाळा चुकवून फिरणाऱ्या विद्यार्थ्यांवर सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी निर्भया पथक इस्लामपूर यांच्या वतीने कारवाई करण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील नशाखोरी व वाढत्या अल्पवयीन गुन्हेगारीबाबत जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशानुसार आष्टा येथे सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी कारवाई केली. यामध्ये विविध शाळेतील अल्पवयीन मुले-मुली हुतात्मा स्मारक, एसटी स्टँड परिसर, बिरोबा मंदिर परिसर, हनुमान मंदिर परिसर अशा ठिकाणी शाळा चुकवून फिरणारे 25 मुला मुलींना मिळून आले. आई-वडिलांना शाळेला जातो असे सांगून शाळेत न जाता ते फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या किशोरवयातील मुलांना समुपदेशन करून त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन समोर देऊन सोडण्यात आले.
सदरची कारवाई इस्लामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत वारके, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका देसाई, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा घस्ते, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील निर्भया पथक इस्लामपूर यांनी केली आहे.
.jpg)




Social Plugin