तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):-ता १९/०२ बुधवार कटचिंचोली येथे विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
क्षत्रिय कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटचिंचोली,व भिमनगर. व धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक कटचिंचोली येथे गावातील युवा व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.व त्यांना मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमाला, जेष्ठ नागरिक, युवा,माजी,आजी सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य शिक्षक, पत्रकार बांधव उपस्थित होते.गावचे सरपंच रविंद्र निवारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली.





Social Plugin