Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्याकडून नागनाथ वाडीतील कचरा संकलित..



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, विकसित भारत हा संदेश नागनाथवाडीतील नागरिकांना देत. पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी  नागनाथवाडी गावातील सर्व रस्ते, नागनाथ मंदिर परिसर स्वच्छ केला. विद्यार्थ्यांनी शिबिर कालावधीत रस्त्याच्या कडेला असणारी अनावश्यक झाडे झुडपे, घनकचरा, प्लास्टिकच्या पिशव्या गोळा केल्या.

 शिबिर काळात विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम घेतले. व समाज प्रबोधन पर व्याख्याने आयोजित केली. श्रमदानातून गावची स्वच्छता करत प्लास्टिक कचरा गोळा करून नष्ट केला. स्मशाना भूमी ग्रामपंचायत परिसर नदीपत्रातील घनकचरा गोळा केला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.के.जी. कुंभार, प्रा.एच.जी. निमसे यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.