Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत अमाना येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

मालेगाव बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारी जयंती दिनानिमित्त ग्रामपंचायत अमानवाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला

छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्याना सोबत घेऊन खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन काळात जातीभेद नव्हता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई विशिष्ट धर्माविषयी नसून अन्याय व अत्याचार करणाऱ्या विरोधात होती रयतेच्या गवताच्या काडीलाही त्याच्या अनुमतीशिवाय हात न लावण्याची ताकीद छत्रपतींनी आपल्या सैनिक व मंत्रिमंडळाला दिली होती महिलांचा सन्मान खऱ्या अर्थाने शिवरायांनीच आम्हाला शिकविला त्यामुळे अशा आदर्श राजा पुन्हा होणे नाही असे यावेळी पत्रकार शिवाजी खडसे यांनी आपले मत व्यक्त केले 

यावेळी ग्रामपंचायत आमानाचे कर्मचारी लक्ष्मण भालेराव सुशील जयस्वाल कैलास भालेराव सचिन बासोळे संदीप भालेराव भीमसेन तायडे सुद्योधन तायडे अरुण घाटोळे देविदास भगत नंदकिशोर जयस्वाल जीवन तायडे आधी