Ticker

6/recent/ticker-posts

ओ.बी.सि.सेवासंघ राजनी यांच्या वतीने शिवजंती उत्सव साजरा.



प्रतिनिधी : शैलेश कावळे लाखांदूर -

          लाखांदूर तालुक्यातील मौजा राजनी येथे दिनांक 21/02/2025 रोज शुक्रवार ला शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार जनसक्ती संघटनेचे अध्यक्ष माझी राज्य मंत्रि मा.बच्चुभाऊ कडु, उपाध्यक्ष मा.उत्तमजी भागडकर जिल्हा सचिव काॅग्रेस कमेटी, उद्दघाटक मा.चेतनभाऊ खडसे सामाजिक कार्यकर्ता नागपूर,सह उद्दघाटक मा.अंकुशभाऊ वंजारी जिल्हा प्रमुख प्रहार जनसक्ती पक्ष,विषेश अतिथी मा.दुधराम बावनकर उपजिल्हा प्रमुख प्रहार,मा.अक्षयभाऊ तलमले तालुका प्रमुख प्रहार पवनी,मा.रसिकाताई रंगारी सदस्या जि.प.भंडारा,मा.देवचंदभाऊ कावळे महाराष्ट्र संघटक भारतीय रोजगार हमी कामगार वेलफेअर संघटना,मा.निश्चयभाऊ दोनाडकर ओबिसी सेवा संघ भंडारा,मा.विनोद दंडारे जिल्हा संघटक प्रहार,मा.दिपकभाऊ पाल जिल्हा संघटक प्रहार,मा.जोशिफभाऊ वाढई सामाजिक कार्यकर्ता ढोलसर,मा.संदिपजी मेश्राम सरपंच राजनी,मा.नेहाताई बगमारे माझी सदस्या पंचायत समिती लाखांदूर,व इतर मान्यवर शिवभक्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   बच्चु भाऊ कडु यांचे राजनी गावा मध्ये आगमन होताच लेझिमच्या व ढोलाच्या तालात भाऊंचे स्वागत करण्यात आले.व बच्चुभाऊ यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले .आणि आपल्या प्रास्ताविक भाषणातून सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी उत्साहाने साजरी करतो परंतु महाराजांचे एक तरी गुण आपल्यात ठेवले पाहिजे,आपण मंदिरात तर पैसा खर्च करण्यापेक्षा आपल्या मुलांच्या शिक्षणात खर्च करा कारण या सरकारच काहीच खरं नाही आहे.त्यामुळे आपण कोणत्याही पक्षाचे न होता शेतकऱ्यांचे,ज्येष्ठांचे व विद्यार्थ्याचे बणा, कारण आपल्या गावामध्ये पक्ष नाही तर आपणच धावणार . गावामधुन शेतामधुन समृध्दी मार्ग जात आहे त्या जमिनीचा योग्य मोबदला नाही दिले आणि तुमच्या जमिनी मोजायला आल्या तर त्याचे तगडे तोडु कारण माझा पहिले पक्ष शेतकरी नंतर माझा पक्ष असेल असे  मा.बच्चुभाऊ कडू यांनी सांगितले, 

यावेळी सुत्रसंचलन मा.नरेशभाऊ ठाकरे माझी त.मुक्त समिती अध्यक्ष राजनी यांनी केले.