बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
समता फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहमधील बंदींचे "नेत्र तपासणी शिबिर" घेण्यात आले होते. यामध्ये कारागृहातील एकूण 230 बंदींचे डोळे तपासण्यात आले. यातील ज्या-ज्या बंदयांना चष्मा लागला आहे, त्या सर्व बंदयांना आज समता फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून विनामूल्य चष्मा वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एस एम खोमणे, लिपिक सी बी गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक समता फाउंडेशन, मुंबई यांचे बंदी परिवर्तन अधिकारी सत्यनारायण इंगळे यांनी केले.
सदर कार्यक्रमास कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, बंदी परिवर्तन अधिकारी सत्यनारायण इंगळे, सुभेदार मानसिंग बागल, कारागृह मुख्यालयातील शिपाई संतोष भोसले, विनोद वाडेकर, सातारा कारागृहाचे शिपाई सागर मासाळ, बालाजी मुंडे, चांद पटेल, प्रशांत कदम, अश्विनी नाळे, लता काळकुटे, गीता दाभाडे, अंकिता करपे, रूपाली नलवडे, सतीश अब्दागिरे, रविराज शेळके, तुकाराम घुटुकडे, संकेत जाधव इत्यादी हजर होते.





Social Plugin