Ticker

6/recent/ticker-posts

समंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा-तहसीलदार यांना निवेदन

 


अमृतसर पंजाब येथे दिनांक :- २६ जानेवारी रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना व संविधान प्रति जाळण्यात आले आहे, त्या संदर्भात भिम टायगर्स ग्रुप चे महासचिव सुपडू शामराव संदानशिव यांनी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांच्या सुचणे नुसार, तहसीलदार यावल यांना निवेदन दिले असून समंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणीचे निवेदन यावल तालुक्यातील समाज बांधव आणि संविधान प्रेमी व भिम टायगर्स ग्रुप च्या कार्यकर्त्यांनी दिनांक :- २९ जानेवारी रोजी दिले.

       सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,अमृतसर पंजाब मध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केली आहे तसेच संविधानाच्या प्रतिची जाळपोळ करण्यात आली आहे, ज्या संविधानामुळे भारतभरात आज प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्सवात संपन्न झाला, त्याच संविधानाच्या प्रति अमृतसर पंजाब मध्ये जाळण्यात आल्या, त्याच संविधान निर्मात्याच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे, तरी या प्रकरणातील संबिधीतावर देश द्रोहाच्या गुन्हा दाखल व्हावा कठोर शासन करण्यात यावे,तरी सदर बाब शासन स्तरावरील निगडित असल्याने संबंधित निवेदनाची प्रत वर्ग करून पुढील कार्यवाही कामे सविनय सादर करण्यात यावी, सदर निवेदनावर पुढील योग्य ती उचित कार्यवाही व्हावी असे आशयाचे निवेदन यावल तालुक्याचे नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या कडे देण्यात आले आहे, निवेदन देतेवेळी अशोक रघुनाथ अडकमोल मोहराळे, किरण मुलचंद तायडे चितोडा, राजु चावदस वानखेडे बोराळे,सतीश तायडे शेळगाव,सचिन शाम सोनवणे, सुपडू शामराव संदानशिव भिम टायगर्स महासचिव महाराष्ट्र राज्य यावल तालुका युनिट मधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच यावल तालुक्यात अश्याच प्रकारांना खत पाणी दिले जात आहे, तरी या संदर्भात सुद्धा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर नायबतहसीलदार संतोष विनंते आणि आपल्या शिष्टमंडळाने सावध राहून ठोस पाऊले उचलली पाहिजेत या संदर्भात चर्चा करण्यात आली.