बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापन भविष्यातील पिढ्यासाठी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी महत्त्वाचे आहे कारण निसर्गातील पर्यावरणाचे रक्षण होते. असे प्रतिपादन प्रा. डॉ.एच .व्ही देशपांडे यांनी केले. कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव येथे भूगोल दिनानिमित्त लीड कॉलेज आणि भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्यशाळा आयोजित कार्यक्रमात 'जलसंवर्धन व जल व्यवस्थापन काळाची गरज ' या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले, रयत शिक्षण संस्थेचे अजीव सभासद, प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर, प्रा.डॉ.ए.एस. जगताप, प्रा. एल. के. पवार, प्रा. श्रीमती एम.बी. सोनार, प्रा.एस. आर धोंगडे इत्यादी उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. देशमुख म्हणाले,' देशाची वाढती लोकसंख्या' प्रदूषण आणि हवामान बदलामुळे पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र वरचेवर कमी होत आहेत .पाणी वाचविण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर आणि पावसाचे जमीनीवर पडणारे पाणी,नदीच्या पाण्याचे योग्य प्रकारे संकलन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जल स्तोत्राचे संवर्धन करणे सुद्धा काळाची गरज आहे.
कारण आरोग्याशी संबंधित धोक्यापासून मानवाचे रक्षण करणे आणि नैसर्गिक परिसंस्थेचा ऱ्हास रोखण्यासाठी जल व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाच्या आहे. याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ' 'छत्रपती शिवाजी महाराजांचा भौगोलिक दृष्टिकोन' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ.ए.एस. जगताप म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राचे महत्त्व ओळखूनच आरमार धोरण राबविले होते. या धोरणामुळेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर व्यापार आणि संरक्षण करणे या दोन्ही गोष्टी सक्षम झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा भौगोलिक दृष्टिकोन केवळ राज्य विस्तारापुरता मर्यादित नव्हता तर संरक्षण, व्यापार, सैन्याची हालचाल, रणनीती इत्यादी क्षेत्रात प्रभाव दिसतो. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम आणि टिकाऊ राज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी.भोसले म्हणाले,'जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापन योजना यशस्वीपणे राबवायच्या असतील तर आर्थिक मर्यादा विचारात घेऊन प्रकल्प योग्य त्या कालावधीत पूर्ण करणे गरजेचे असते. पर्यावरणाचा समतोल राखणे, प्रदूषणावर लक्ष केंद्रित करून प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जलसंवर्धन व जल व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक व सामाजिक दोन्ही घटक महत्त्वाचे आहे. याविषयीची सविस्तर माहिती सांगितली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा .एल.के. पवार यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. एस. आर. धोंगडे यांनी केले. आभार प्रा. स्नेहल मदने यांनी मानले .कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin