Ticker

6/recent/ticker-posts

समित पवार यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी डिस्कळचे मेघराज निकम यांची महाराष्ट्र खते उत्पादक न्याय हक्क समितीवर नियुक्ती



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे] 

महाराष्ट्र राज्यामधील सर्व खते उत्पादक एकत्र येऊन खते उत्पादनामध्ये होणारा काळा बाजार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी खते उत्पादक न्याय हक्क समिती ची स्थापना केली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी खते उत्पादक न्याय हक्क समितीची स्थापना 7 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व कृषी  खते व औषधे उत्पादक यांची बैठक घेऊन स्थापना करण्यात आली.

ही समिती स्थापना करण्यामागे जे कृषी उत्पादक व्यवसायिक विनापरवाना व्यवसाय करत आहेत त्यांना आळा बसावा यासाठी करण्यात आलेली आहे. बरेचशे कृषी व्यवसायिक जीएसटी भरत नाहीत त्यांना नियमात काम करावे यासाठी ही समिती स्थापन करण्यात आला आहे. बऱ्याचदा जे परवानाधारक उत्पादक नियमात असून त्यांना शासकीय व अशासकीय होणारा त्रास कमी करण्यासाठी या समितीकडून ग्रामीण भागापर्यंत लक्ष दिले जाईल.  

महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरून येणारे निकृष्ट दर्जाची कृषी खते आणि कीटकनाशके यांना आळा बसावा आणि शेतकऱ्यांचे होणारी कोट्यावधींची फसवणूक दूर व्हावी यासाठी या समितीकडून प्रशासकीय अधिकारी यांकडे वेळोवेळी माहिती देऊन कारवाई केली जाईल. यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर या बोगस खतांमुळे पडणारा उत्पादनाचा ताण कमी होईल आणि त्यांनी निकृष्ट दर्जाच्या कृषी मालाला आळा बसेल.

महाराष्ट्रातील बोगस कृषी खते व औषधे उत्पादन करित असलेले प्लांट समितीमुळे जागीच थांबतील. महाराष्ट्रात जे बोगस खते आणि कीटकनाशके विकणारे दुकानदार आहेत त्यांची माहिती शासनाला या कमिटी मार्फत देण्यात येईल. या समितीमार्फत परवानधारक व्यवसायिकांच्या हक्कांच्या मागण्या ,त्यांचे निवेदन वेळोवेळी शासनाला सादर करण्यात येतील.

कृषी आयुक्त, कृषी मंत्रालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर वेळोवेळी बैठक घेऊन कृषी दुकानदार, कृषी व्यावसायिक आणि कृषी उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांच्या अडचणी तसेच यामध्ये होणारा काळाबाजार वेळोवेळी शासनापर्यंत पोहोचण्यात येईल. 

या समितीची कार्यकारणी खालील प्रमाणे

महाराष्ट्र खते उत्पादक न्याय हक्क समिती यांच्या अध्यक्षपदी सुमित पवार यांची तर उपाध्यक्षपदी मेघराज निकम  यांची निवड झाली. सरचिटणीस पदी रवी नरसाळे यांची निवड झाली.चिटणीसपदी जयदीप पाटील.खजिनदारपदी अमोल राठोड. संपर्कप्रमुख राजेश मुखणे.सहसंपर्कप्रमुख शिवकुमार शिंदे.प्रवक्ता सुहास थोरवत.सहप्रवक्ता स्वप्निल सूर्यवंशी.व्यवस्था प्रमुख इरफान शेख आणि महाराष्ट्रातील विभागीय समितींवर पुणे विभागासाठी संदीप पाटील अध्यक्षपदी निवड झाली. कोल्हापूर विभाग अध्यक्ष मदन अनुसे.नाशिक विभाग अध्यक्ष विक्रम दिसले.अमरावती विभाग अध्यक्ष पवन झोरे. संभाजीनगर अध्यक्षपदी योगेश ढोकळे यांची नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्र खते उत्पादक समितीमार्फत शेतकऱ्यांच्या, खते दुकानदाराच्या आणि खते उत्पादक कंपन्यांच्या कायमस्वरूपी हिताचे प्रयत्न केले जातील आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचा खतांचा पुरवठा होईल याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र खते उत्पादक न्याय हक्क समितीचे उपाध्यक्ष मेघराज निकम यांनी दिली आहे .