बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
आंधळेपणाने एखादी गोष्ट आपण स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते श्री.भगवान रणदिवे यांनी केले. पुढे आपल्या भाषणात श्री.रणदिवे म्हणाले,'अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. त्यामध्ये जादू तंत्र मंत्र जादूटोणा नरबळी नजर भूत ,पिशाच्च इत्यादी बाबत समाजात अफवा पसरवून त्यासंबंधी एखादी वाईट कृती केल्यास प्राणीमात्रावर व समाजावर विपरीत परिणाम होत असतात.
व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.के.जी.कुंभार, प्रा.एच.जी. निमसे , तसेच श्री.प्रकाश खटावकर, श्री चंद्रकांत बर्गे, श्री. सुधाकर बर्गे जनार्दन घाडगे इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक कृतीकडून समाजाचे शोषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १९१३ मध्ये कठोर कायदा केला. याविषयी विद्यार्थ्यांना 'हसत खेळत विज्ञान आणि चमत्कार' याविषयीची विस्तृत माहिती सांगितली. कार्यक्रम प्रसंगी पिण्याच्या पाण्याने दिवा पेटविणे, लंगर तोडणे इत्यादी प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना अंधश्रद्धे विषयीची माहिती दिली . "लिंबू मिरची बांधली दारावर सांगे बाहेरच बघायला. विज्ञान विसरलं " तसेच"माझ्या भारत देशात कोणी किती शिकल साधे विज्ञान विसरले". या गीताच्या माध्यमातून अंधश्रद्धे विषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
रूढी परंपरेच्या नावाखाली लोकांची फसवणूक होऊ नये, समाजात जागृती निर्माण व्हावी हाच कार्यक्रम मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.के.जी.कुंभार यांनी केले .सूत्रसंचालन कु. साक्षी माने हीने केले .तर आभार श्री. शुभम फडतरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिबिरार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin