प्रथम शिवप्रतिमेचे पूजन ग्रा. प. सदस्य सुनील घाडगे यांच्या हस्ते झाले व पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दिलीप जाधव सदस्य बाळु गोपाळ गावचे पोलीस पाटील नामदेव गोपाळ ग्रा. प. सदस्य सुनिल घाडगे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका वर्ग याच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषणने तर खूप आनंद झाला पहिलीच्या वर्गा पासून तर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी खुप सुंदर असे शिवाजीराजे यांच्या विषयाशी निगडित असे खूप सरेख असे भाषणे दिली शिक्षकाचे तर खुप खुप आभार मानावे कारण एकेक विद्यार्थी तयार करने खुप मेहनत घ्यावी लागते खरच शिवापूर येथील शाळेला म्हणजे माझ्या गावात शिक्षक वर्ग खुप छान आहे व ते खुप सुंदर असे शिक्षण ही देतात





Social Plugin