संदिप गावडे @ प्रतिनिधी
येथील महात्मा गांधी विद्यालय (एमजीव्ही) १९९८, १० वी बॅच सेवाभावी संस्था तसेच तगारे प्रतिष्ठान व माजी शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धा शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता येथील भाजी मंडई येथे होणार आहे.
या स्पर्धेसाठी माझी शाळा, माझा आवडता प्राणी, निसर्ग चित्र किंवा विज्ञान चित्र असे विषय असतील. यासाठी दिडतास वेळ असून कोणत्याही एका विषयावर चित्र काढावयाचे आहे. तसेच यासाठी लागणारा कागद आयोजकाकडून देण्यात येणार असून इतर लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावयाचे आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सेवाभावी संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.





Social Plugin