Ticker

6/recent/ticker-posts

सूर्यगाव विकास सोसायटीच्या चेअरमन पदी सुरेश पाटील



संदिप गावडे @शहर प्रतिनिधी 

           सूर्यगाव (ता. पलूस) येथील सूर्यगाव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश भानदास पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडबद्दल त्यांचे सर्व स्तरातून सत्कार व अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

       सोसायटीचे माजी चेअरमन नितीन सूर्यवंशी यांनी राजीनामा दिल्यामुळे रक्त झालेल्या पदावर सुरेश पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पलूसचे सचिन पाटणकर यांनी काम पाहिले. तर सचिव सुभाष तातुगडे, क्लार्क सागर सूर्यवंशी यांनी त्यांना सहकार्य केले. 

      या निवडीवेळी सुरेश पाटील म्हणाले, विकास सोसायटी म्हणजे ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. सूर्यगावत एकच विकास सोसायटी असल्यामुळे गावातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी सोसायटीचा कारभार लक्ष देऊन करतात. शेतकरी, सभासद येथे हक्काने आपली संस्था म्हणून येतात. सोसायटीचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन शेतकरी व नागरिकांच्या सहकार्याने आत्तापर्यंत चालत आलेल्या उत्तम कामकाजात सोसायटीच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवला जाईल. असेही ते म्हणाले. 

      यावेळी सूर्यगावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे उपाध्यक्ष, संचालक, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद तसेच अनेक नागरिकांनी निवडीनंतर त्यांचे अभिनंदन केले.