Ticker

6/recent/ticker-posts

अष्टविनायक मंडळाच्यावतीने श्री गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन



संदिप गावडे @ आष्टा प्रतिनिधी 

         येथील चव्हाणवाडीचा राजा श्री अष्टविनायक गणेश मंडळाच्यावतीने श्री गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

      शनिवार दि.०१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री गणेश जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी ७ वाजता श्रीं च्या मुर्तीचे पुजन व अभिषेक तसेच ९ ते ११ पर्यंत श्री गणेश मंत्र नामस्मरण जप होईल. तर सकाळी ११.११ वाजता गणेश जन्मकाळ व फुले वाहण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन केले असून सर्व गणेश भक्तांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. 

    तसेच मंगळवार दि. ४ रोजी सायं. ९ वाजता झी टॉकीज फेम मन मंदिरा गजर भक्तीचा युवा किर्तनकार ह.भ.प. शिवलीला ताई पाटील यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मृदुंगमणि ह.भ.प. शिवप्रसाद अशोक पाटील मर्दवाडी, ह.भ.प. शुभम बाबर खंडोबाचीवाडी तसेच किर्तन साथ मर्दवाडी सांप्रदायिक भजनी मंडळ मर्दवाडी, सांप्रदायिक भजनी मंडळ गोटखिंडी, ज्ञानेश्वरी साधना मंडळ आष्टा, श्री दत्त भजनी मंडळ आटुगडे मळा, दिनकर आरगे महाराज तुंग यांची भजनी सेवा होणार आहे. 

       या कार्यक्रमाचे संयोजन धाडस ग्रुप व सरकार ग्रुप चव्हाणवाडी, संयुक्त चव्हाणवाडी शिवजंयती उत्सव समिती यांनी केले असून श्री गणेश जयंती निमित्त होणाऱ्या या विविध कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन देखील केले आहे.