Ticker

6/recent/ticker-posts

अमोलजी पाटणकर (OSD)मुख्यमंत्री कार्यालय यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजा येथे मॅरेथॉन संपन्न---३७२खेळाडूंचा सहभाग



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

 विशेष म्हणजे कारंजा मॅरेथॉनचे शिल्पकार डॉ अजय जी कांत यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा घेण्यात आली. दी ९/२/२५ प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे (OSD) अमोल जी पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजा येथे श्री प्रकाश दादा डहाके वन पर्यटन केंद्रामध्ये मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कारंजा तालुक्याचे तहसीलदार कुणाल झाल्टे सर व कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी अमित जी शिंदे तसेच कारंजाचे डॉ असोसिएशनचे अध्यक्ष शार्दुलजी डोणगावकर कारंजा येथील मॅरेथॉनचे शिल्पकार अजयजी कांत यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन दौड सुरु करण्यात आली. मॅरेथॉनचे प्रास्ताविक पराग गुल्हाने सर तर आभार प्रदर्शन डॉ राम गुंजाटे सर यांनी केले. त्यावेळी अगदी बच्चे कंपनी पासून तर तरुण वयवृद्ध पर्यंत मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मॅरेथॉन दोन टप्प्यांमध्ये आयोजित केली होती. महिला ३km व पुरुष ५km अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पाडण्यात आली.

OSD श्री अमोल पाटणकर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या या अनमोल कार्यामुळे दिन दुबळ्या लोकांचे अगदी कामे सहजपणे होतात. मुख्यमंत्री कार्यालय मध्ये आपल्याला पाटणकर साहेबाकडे सहज तऱ्हेने जाता येथे. एवढा मोठा अधिकारी असून देखील सुद्धा आपल्या सहस्त्रने उपलब्ध होतात. व हीच त्यांची खास शैली आहे. विशेष म्हणजे सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर चालणारा पहिला अधिकारी आहे.