Ticker

6/recent/ticker-posts

संकट मोचन मित्र मंडळाच्यावतीने मेडशी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे, संकट मोचन मित्र मंडळाच्या वतीने हिंदुस्तानचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, मेडशी दि. १९ फेब्रुवारी रोजी लोककल्याणकारी राजे, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची मेडशी येथील नेताजी चौक येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीच्या मावळ्याना सोबत घेऊन खरया अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन काळात जातीभेद नव्हता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई विशिष्ट धर्माविषयी नसून अन्याय व अत्याचार करणाऱ्या विरोधात होती. अनुमतीशिवाय हात न लावण्याची ताकीद छत्रपतीनी आपल्या सैनिक व मंत्रिमंडळाला दिली होती महिलांचा सन्मान खऱ्या अर्थाने शिवरायांनीच आम्हाला शिकविला त्यामुळे छत्रपती शिवाजी

महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करून रयतेचं स्वराज्य स्थापन केलं आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श निर्माण केला.

महाराष्ट्राची अस्मिता जागवत त्यांनी अटकेपार झेंडा फडकवण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत आणि ताकद महाराष्ट्राला दिली. अशा महान राजाला मानाचा मुजरा करून मेडशी येथील नेताजी चौकामध्ये संकट मोचन मित्रमंडळाचे सर्व सदस्यांनी आनंदात शिवजयंती साजरी केली.यावेळी.मेडशी येथील संकट मोचन मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते