Ticker

6/recent/ticker-posts

कसबे डिग्रज येथे छ.शिवजयंती उत्सव साजरी



वार्ताहर ग्रामीण प्रतिनिधी अभिजित भोईटे

कसबे डिग्रज. तालुका मिरज जिल्हा सांगली येथे सिद्धार्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे , सिद्धार्थ चौक येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

महाराजांच्या मूर्तीस कसबे डिग्रज गावचे सरपंच रियाज तांबोळी व उपसरपंच योगेश (बापु) सायमोते यांनी पुष्पहार अर्पण करून नमन केले व महाराजांचे आचार विचार आमंलात आणून वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन तरुणाईला सोबत घेऊन कसबेडिग्रज हे गाव नेहमीच कार्य करत राहील असेही या वेळी बोलताना उपसरपंच योगेश (बापु) सायमोते यांनी आपले मत मांडले,सरपंच रियाज तांबोळी यांनीही सहमती दर्शवली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद कांबळे,तसेच स्नेहजीत कसबेकर,शिवाजी भोसले,संतोष भोसले,पवन कांबळे,विनोद जगदाळे, वैभव कांबळे व मंडळाचे कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत जयंती साजरी झाली.