Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी खेळाडूंना राज्यस्तरीय संकल्प आदियुवा क्रिडा स्पर्धेतून प्रोत्साहन

    


 कृष्णा पवार @ग्रामीण प्रतिनिधी नाशिक

 नाशिक - दि.30  राज्यस्तरीय आदियुवा क्रिडा स्पर्धा दिनांक 28 ते 29 जानेवारी रोजी नाशिक येथे मोठ्या उत्साहाने पार पडल्या. या स्पर्धेचे आयोजन संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना महाराष्ट्र राज्य* यांच्यावतीने करण्यात आले होते.यामध्ये नाशिक , धुळे, अहिल्यानगर  व नंदुरबार जिल्हासह *एकुण 93 संघानी* सहभाग नोंदवला. यामध्ये  मुलां- मुलींचे कबड्डी 45 , खो-खो - 32 व व्हाँलीबाँल 16 संघ सहभागी होते.

          राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा निम्मिताने नाशिक शहरात राहणाऱ्या आदिवासी खेळाडू  व बांधवांना एका ठिकाणी विविध स्पर्धाचे आयोजन केल्याने विविध तालुका- जिल्ह्यातील  खेळाडुंना ही स्पर्धा प्रेरणादायी व प्रोत्साहन  देणारी ठरेल , असा विश्वास स्पर्धेच्या *उद्दघाटन प्रसंगी प्राचार्य अशोक बागुल सर* यांनी व्यक्त केला.

               *आदियुवा क्रिडा महोत्सव स्पर्धेच्या उद्दघाटन* प्रसंगी प्रमुख अतिथी मा.महापौर रंजनाताई भानशी , आदिवासी बचाव अभियानचे अध्यक्ष प्रा.अशोक बागुल , कोकणी-कोकणा समाज सेवा संघाचे अध्यक्ष जयवंत गारे , मा.सभापती महेश टोपले, सामाजिक कार्येकर्ते किरण तरवारे, पृथ्वीराज अंडे , के.के. गांगुर्डे , चिंतामन गायकवाड, विक्की मुंजे, डाँ.दिनेश चौधरी , डाँ.कमलाकर जाधव , दुर्वादास गायकवाड , समालोचन डी.बी.बहिरम , संकल्प आदियुवा संघटनेचे पदाधिकारी डाँ.राजेंद्र बोरसे,  डाँ.राहुल गावित,  विजय अहिरे, रुपेश गावित, गौरव चौधरी , धर्मराज महाले , अनिल बोरसे, गणेश वाघमारे आदी उपस्थित होते.

          

   1️⃣    *खुल्या पुरुष गट - कबड्डी स्पर्धेत*   

प्रथम क्रमांक - *महाराष्ट्र पोलीस अँकडमी नाशिक*  , द्वितीय क्रमांक - *स्वास्तिक क्लब नाशिक* या संघाला तर तिसऱ्या स्थानी *अर्जुन सागर कळवण* व चौथ्या स्थानी *नाशिक पोलीस संघानी* बाजी मारली. 

             तसेच

 *खुला गट महिला कबड्डी स्पर्धा*

प्रथम- बालाजी फाऊंडेशन नाशिक 

द्वितीय - आदिवासी संघ सुरगाणा 

तृतीय - महाराष्ट्र पोलीस नाशिक 

                व 

*लहान गट मुले- कबड्डी स्पर्धा U- 19*

प्रथम पारितोषिक - *सायखेडा ता.निफाड* जि.नाशिक , द्वितीय - *आदिवासी क्रिडा प्रबोधनी* नाशिक 

तृतीय - *आर्यन सागर बागलाण* , चतुर्थ - *दह्याने ता.चांदवड* जि.नाशिक 


 2️⃣   *शाँटी व्हाँलीबाँल   - open* 


1)  व्हाँलीबाँल संघ अहिल्यानगर 

2)  देवकनसरा क्लब बोरगड ,नाशिक 

3) बिरसा व्हाँलीबाँल संघ खिरकडे ( पेठ )

 4) व्हाँलीबाँल ग्रृप पातळी- जांबविहिर ( पेठ )


3️⃣  *खो-खो  - open* पुरुष गट


1) ग्रामिण संघ नाशिक (दिलीप खांडवी)

2) पोलीस अँकेडमी नाशिक 

 3) खो-खो फायटर नाशिक 

4) ञ्यंबकेश्वर - हरसुल संघ


       *खो-खो  - Open* महिला /मुली

1) मायबोली अँकेडमी  नाशिक 

2) आदिवासी क्रिडा प्रबोधनी  नाशिक 

3) महाराष्ट्र पोलीस नाशिक 

4) आदिवासी मुलींचे वसतिगृह  साक्री


          विजेत्या संघाचे बक्षिस वितरण  रोख रक्कमेसह ट्राँफी , मेडल देऊन संकल्प आदिवासी युवा जागृती संघटनेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

        कबड्डी स्पर्धेचे आयोजक संकल्प आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन खंबाईत , कांतीलाल मोरे , सुनिलभैय्या गांगुर्डे ,राजेंद्र गांगोडे, कांतीलाल नाठे , किरण खंबाईत ,मयुर बागुल, सुरेन्द्र चौरे ,पप्पू गवळी, गोटू नाठे, विजय घुटे , राजू जाधव ,मा़ँन्टी खंबाईत  , राजेंद्र गायकवाड  यांनी परिश्रम घेतले. संकल्प आदियुवा टिम पेठ ,सुरगाणा, साक्री यांनी नियोजन केले तर मोलाचे सहकार्य कणसरामाता मिञमंडळ यांनी केले.