Ticker

6/recent/ticker-posts

गेवराईत आज कै.पार्वतीमाता यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनंजय म.चव्हाण यांचे कीर्तन .


तालुका प्रतिनिधी 

मारोती गाडगे/गेवराई 

गेवराई (बीड):-
      गेवराई शहरात कै.सौ.पार्वतीमाता सखारामजी काळे यांच्या द्वितीय पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शुक्रवार, दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत श्री.ह.भ.प. धनंजय महाराज चव्हाण यांचे कीर्तन सेवा होणार आहे. तरी भक्त परिवाराने माता पार्वती धाम, दारलूमच्या पाठीमागे गेवराई येथे उपस्थित रहावे असे आवाहन काळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
      कै.सौ.पार्वतीमाता सखारामजी काळे यांच्या द्वितीय पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त माता पार्वती धाम, दारलूमच्या पाठीमागे गेवराई येथे शुक्रवार, दि.१४ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी १० ते १२ यावेळेत श्री.ह.भ.प.धनंजय महाराज चव्हाण यांची कीर्तन सेवा होणार आहे. कीर्तनानंतर दुपारी  १ ते ४ यावेळेत उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी नागरिकांसह  मॉं संतोषी भक्त परिवाराने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त काळे परिवार व माता पार्वती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.