अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड: पोलीस ठाणे अंबड येथे दिनांक 25/03/2025 रोजी फिर्यादी जगन्नाथ गणेश तिकांडे वय 33 वर्षे रा. शेवगा ता. अंबड जि. जालना यांनी फिर्याद दिली कि, फिर्यादी यांनी स्नेहश्री मल्टीस्टेट पंथसंस्थेतुन वैयक्तिक कामाकरीता कर्ज घेतले होते. त्याकरीता बँक मॅनेजर सुनिल बाप्पासाहेब कुढेकर याच्याकडे 06 कोरे बँकेचे चेक दिले होते. फिर्यादी यांनी बँकेकडुन घेतलेले कर्ज परत फेड केल्यानंतर त्यांनी बँकेला दिलेले कोरे चेकची मागणी केली असता बँकेने टाळाटाळ करुन फिर्यादीस चेक परत दिले नाही तसेच स्नेहश्री मल्टीस्टेटचा मॅनेजर इतर आरोपीतांनी अफ्सात संगणमत करुन बनावट अधारकार्डच्या सहाय्याने फिर्यादी यांच्या बँकेतुन चेकद्वारे 65,000/- रुपये काढुन फिर्यादीची फसवणुक केली आहे म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तात्काळ तपास सुरु करुन सदर गुन्हयातील आरोपी सुनिल बाप्पासाहेब कुढेकर यास ताब्यात घेवुन कसुन तपास केला असता त्याने व 1) आदर्श आनंद मस्के वय 21 वर्षे रा. बनगाव ता. अंबड जि.जालना, 2) प्रशांत प्रकाश बरडे वय 20 वर्षे रा. शारदा नगर अंबड 3) शुभम कांता सोनवणे रा. इंदलगाव ता.घनसावंगी जि. जालना यांनी मिळून स्नेहश्री बँक जालना रोड येथे चोरी करुन बँकेतील पाच संगणक, एक प्रिंटर व कर्जदार यांच्या 800 कर्जाच्या फाईल्स 5000 चेक असे चोरी केल्याची कबुली दिल्याने यातील पाहीजे असलेले आरोपी आदर्श मस्के व प्रशांत बरडे यांचा शोध घेवुन नमुद तिन्ही आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. तसेच सदर गुन्हयातील फिर्यादीचे बँकेतुन काढलेले 65 हजार रुपये हे आरोपीकडुन जप्त करण्यात आलेले आहेत तसेच यातील आरोपीतांना विश्वासात घेवुन तपास केला असता बँकेतुन चोरी केलेल्या कर्ज फाईल व चेक यापैकी काही चेक व फाईल घरी असुन बाकीच्या फाईल व चेक तसेच कॅम्युटर व प्रिंटर हे आदर्श मस्के यांच्या शेतात जाळले असल्याचे सांगितल्याने पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला घरातुन दोन फाईल क 12 कोरे चेक जप्त करण्यात आले असुन उर्वरित फाईल व चेक जाळलेल्या ठिकाणी फाईलच्या क्लीप स्प्रिंग मिळुन आल्या तेव्हा आरोपी आदर्श मस्के यास कॅम्युटर व प्रिंटर बाबत विचारणा केली असता त्याने सांगितले कि, त्याने व त्याचा मित्र शुभम सोनवणे यांनी कॅम्युटर व प्रिंटर हे जोगलादेवी बंधाऱ्यामध्ये नेवुन टाकलेले आहेत तेव्हा सदर ठिकाणी जावुन गोताखोर यांच्या मदतीने शोध घेवुन सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपी आदर्श मस्के याने त्याचे ए एम ग्राफीक्स येथे बनावट अधार कार्ड बनवलेले साहीत्य सी पी यु, मॉनिटर व प्रिंटर जप्त करण्यात आलेले आहे. सदर तिन्ही आरोपीतास दिनांक 25/03/2025 रोजी अटक करुन मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीतास दिनांक 30/03/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे.
सदरची कामगीरी मा.श्री अजय कुमार बन्संल पोलीस अधिक्षक जालना, मा.श्री अयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना. मा. श्री विशाल कृष्णा खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड, मा.श्री सिध्दार्थ बारवाल परि. पोलीस अधिक्षक पोलीस ठाणे अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अमोल गुरले, पो.हे.कॉ विष्णु चव्हाण, दिपक पाटील, पो.ह.घाणे ,सागर बाविस्कर, पो.कॉ. स्वप्निल भिसे, अरुण मुंडे, अशोक भांगळ, होमगार्ड राजेश शिंदे यांनी पार पाडलेली आहे





Social Plugin