Ticker

6/recent/ticker-posts

कारंजातील गुरूमंदिर व तिर्थक्षेत्र पोहरादेवी विकासकामासाठी ८९३ कोटींचा निधी मंजूर



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 


|तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ग्रामविकास तसेच पर्यटन विभागाने सुधारित नियमावली करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गुरुमंदिर तिर्थक्षेत्र प्रस्तावित १७० कोटी तर श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रकल्प १ व प्रकल्प २ अशी एकूण ७२३ कोटी रुपयांची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीत देण्यात आली, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाने सुधारित नियमावली करावी जेणेकरून राज्यातील भागनिहाय महत्व लक्षात घेवून सर्वसमावेशक प्रस्ताव जिल्ह्यांकडून सादर होतील अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीलाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार संजयदेशमुख, आमदार सईताई प्रकाश डहाके यासह हे विविध देवस्थान मंदिराचे कार्यवाहक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेकी, वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गुरूमंदिर तिर्थक्षेत्र विकास आणि श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तिर्यक्षेवविकास आराखडयातील प्रकल्प १ व प्रकल्प २ च्याकामांना आज मान्यता देण्यात आली आहे ही कामे गतीने करण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, नागपुर, नंदनवन ले आऊट येथील लक्ष्मीनारायण व शिव मंदिरपरिसराचा सुशोभिकरण व पुर्नविकास करणे, नागपूर भांडेवाडी येथील श्री मुरलीधर मंदीत तिर्थक्षेत्राचा विकास करणे तसेच नागपूर शांतीनगर इतवारी रेल्वे स्टेशनजवळील कुतेयाला आश्रमाचे सुशोभिकरण आणि विकास करण्याबाबत कामांना उच्च स्तरीय समितीने मान्यता दिली असून ही कामे गतीने करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे सादर करताना कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाची कामे करण्यासाठी प्रशासनाने भर द्यावा कोणताही प्रस्ताव सादर करताना भविष्यातील गरजा आणि त्या परिसरातील आवश्यकता लक्षात घेवून प्रस्ताव सादर केले जावेत. ग्रामविकास, पर्यटन विभाग त्याचप्रमाणे या विषयाशी संबंधित इतर विभागांनी तीर्थक्षेत्र विकासआराखडा बनविताना नवीन मार्गदर्शक तत जारी करावीत अशा सूचना त्यांनी यावेळ केल्या.

या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधका विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीष म्हैसकर, नियोजन विभागाचे अपर मुख् सचिव राजगोपाल देवरा, नगर विकार विभागाचे प्रधान सचिव डॉ. के एच. गोविंदराज, ग्रामविकास विभागान प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्री प्रधानसचिव अधिनी भिदे, सचिव डॉ. श्रीक परदेशी, एमटीडीसीचे व्यवस्थापक संचालक मनोज सूर्यवंशी, दूरदूर प्रणालीव्दारे वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.