*जलतारा मिशन अंतर्गत विद्यार्थी व शेतकरी यांना केले मार्गदर्शन*
मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले
पिंपळदरा : दिनांक 22 /03/2025 रोजी पिंपळदरा येथील जिल्हा परिषद शाळा येथे भेट देऊन ग्रामस्थांना जलतारा या योजनेची माहिती दिली. त्यांनी शेतकरी गावकरी, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून जलतारा उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले.
जलतारा योजनेंमुळे भूजल पातळी वाढून पाण्याची टिकाऊ उपलब्धता राहणार आहे. शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, पावसाचे पाणी साठवता येईल आणि पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होणार आहे
प्रशासनाच्या आवाहनानुसार, शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन जलतारा खोदणीसाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. असे मालेगाव चे तहसीलदार दीपक पुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात सांगण्यात आले. असेच कृषी सहाय्यक डी के रणवीर यांना ही जलतारा योजनेबद्दल भरपूर मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी यांची गुणवत्ता तपासण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण व शाळेतील हे वातावरण उत्कृष्ट दर्जाचे आहे असे उपस्थित मान्यवरा कडून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित कृषी सहाय्यक. महसूल विभागातील कर्मचारी वर्ग तथा केंद्रप्रमुख व निरीक्षक व्ही एस सोनुने सर, पोलीस पाटील योगीराज खडसे, मेडशी गावचे पत्रकार सचिन साठे,अजिंक्य मेडशीकर व पिंपळदरा गावचे समस्त गावकरी विद्यार्थी व शेतकरी वर्ग यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मस्के सर यांनी केले





Social Plugin