मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमातर्गत 24 मार्च हा "जागतिक क्षयरोग दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी दिली आहे.
जागतिक स्तरावर दरवर्षी 24 मार्च हा दिवस क्षयरोगविषयी जनजागृती करण्यासाठी "जागतिक क्षयरोग दिन" म्हणुन साजरा करण्यात येतो. राज्यात 100 दिवस मोहिमेच्या निमित्ताने विविध प्रभावी प्रचार व प्रचार माध्यमांच्या वापर करून क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे. जनजागृतीची व्याप्ती अधिक वाढविण्यासाठी ह्या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च 2025 साठी "Yes! We can End TB: Commit, Invest, Deliver" हे इंग्रजीतून तर "होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतोः प्रतिज्ञा करा, तरतुद करा, सेवा द्या" हे मराठीतून घोषवाक्य तयार केलेले आहे. या घोषवाक्यानुसार क्षयरोग संपविण्यासाठी सर्वांनी 3 प्रकारची कार्यवाही करण्यावर विशेष भर देणे आवश्यक आहे.
१) प्रतिज्ञा करा सर्व भागीदारांनी क्षयरोग संपविण्यासाठी प्रतिज्ञा घेणे.
२) तरतुद करा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणे क्षयरोगविषयक सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी असलेल्या त्रुटी दुर करणे आणि प्रगतशील संशोधन करणे यासाठी निधीची तरतुद करणे.
३) सेवा द्या-क्षयरुग्णांच्या फायद्यासाठी प्रतिज्ञेनुसार व केलेल्या तरतूदीनुसार त्यांना दर्जेदार सेवा देणे.
या दिनानिमित्त क्षयरोगाविषयी समाजात जनजागृती करण्याकरीता विविध कार्यक्रम, बैठका, चर्चासत्रे, क्षयरोगाविषयक विविध प्रसिध्दी साहित्याचे प्रदर्शन, रॅली, चित्ररथ, रांगोळी स्पर्धा पथनाट्य, क्षयरोग मुक्त ग्राम पंचायत गौरव समारंभ इ. प्रकारे समाजातील सर्व स्तरावर विविध माध्यमाव्दारे कार्यक्रमाचे आयोजन करुन 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणु साजरा करण्यात येणार आहे.
टीबी मुक्त ग्रामपंचायत 2024 घोषित करण्याकरीता ग्रामपंचायत स्तरावरुन प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. सन 2024 करीता 9 ग्रामपंचायतीची रौप्य पुरस्काराकरीता तसेच 180 ग्रामपंचायतींची कास्य पुरस्काराकरीता निवड करण्यात आलेली आहे.
* निक्षय मित्र ( क्षयरुग्ण दत्तक घेण्याकरिता )आवाहन *
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत "प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान" या धोरणानुसार क्षयरुग्णांना अभियानांतर्गत सामाजातील दानशुर व्यक्ती, संस्था, कंपनी, लोकप्रतिनिधी हे निक्षय मित्र बनून क्षयरुग्ण दत्तक घेवून त्यांना उपचार कालावधीपर्यंत प्रतिमहिना फुड बास्केट देण्यात यावी. आपल्या माध्यमाव्दारे समाजातील दानशुर, प्रतिष्ठित व्यक्तींना निक्षय मित्र होवून समाजातील गरजु व गरीब क्षयरुग्णांना पोषण आहार किट देवून शासनाच्या या उपक्रमास सहकार्य करावे. तसेच क्षयरोग मुक्तीसाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा असून जनभागीदारी व्दारे ही मोहिम आपण यशस्वी करु शकतो तरी सर्वांनी या मोहिमेत सहभागी होवून ही मोहीम यशस्वी करुया असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश परभणकर यांनी केले आहे.





Social Plugin