बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा या मध्ये उज्वल यशाची परंपरा असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वर्धनगड ता खटाव जि सातारा या शाळेची विद्यार्थिनी श्राव्या विक्रम कुंभार ही पी. एम. श्री जवाहर नवोदय विद्यालय खावली सातारा प्रवेश निवड चाचणीमध्ये पात्र ठरली आहे. आत्तापर्यंत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये तिने राज्यस्तरावर बहुमूल्य यश संपादन केले आहे.
श्राव्याचे मार्गदर्शक मुख्याध्यापिका सौ.सीमा कदम ,सौ.संजीवनी देशमुख, श्री.शंकर फडतरे , सौ.कमल भोंडवे, श्री.कृष्णात फडतरे, सौ.मयुरी सुतार,अक्षय सुतार ज्ञानदा परिवार वर्गशिक्षक व तिचे वडील विक्रम कुंभार यांचे मार्गदर्शन मिळाले ,तर तिची आई सौ.श्रद्धा कुंभार व आजोबा श्री. लक्ष्मण कुंभार यांच्याकडून प्रेरणा मिळाली कु.
श्राव्या कुंभार हिच्या अलौकिक यशा बद्दल गटशिक्षणाधिकारी सौ.सोनाली विभुते मॅडम,शिक्षण विस्तार अधिकारी सौ. संगीता गायकवाड मॅडम, केंद्रप्रमुख श्री. नवनाथ गावडेसाहेब, माजी केंद्रप्रमुख श्री.प्रमोद जगदाळेसाहेब,माजी मुख्याध्यापिका सौ.उषा जाधव मॅडम, श्री.आलमगीर मुल्ला सर,वर्धनगडचे मा. सरपंच आणि जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य श्री.अर्जुन मोहिते,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.निता पवार,सर्व सदस्य,ग्रामस्त वर्धनगड यांनी तिचे अभिनंदन केले





Social Plugin