आष्टा /प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती इस्लामपूरच्या वतीने आष्टा येथील उपबाजारात हळद सौद्यांचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक वैभव शिंदे व वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्राम जाधव यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे माजी संचालक विराज शिंदे, उपसभापती शिवाजी आपुगडे, बाजार समिती संचालक डॉ.अशोक पाटील, व्यापारी प्रतिनिधी बाळासाहेब इंगळे, कु. डॉ. विश्वजा वैभव शिंदे, माणिक शेळके, माजी नगरसेवक अर्जुन माने, दत्तात्रय मस्के हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी वैभव शिंदे म्हणाले, स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून आष्टा येथे इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार सुरू करण्यात आला. आष्टा व परिसरात मोठ्या प्रमाणात हळदीचे होते. येथील शेतकऱ्यांनी पिकवलेली हळद सांगली येथे मार्केट यार्डात घेऊन जावे लागत असे. त्यासाठी त्यांचा वेळ व पैसा खर्च होत असल्याने गेली दहा वर्षे झाली, आष्टा येथील उपबाजारात हळदीचे सौदे सुरु केले. त्यामुळे त्याचा फायदा हळद उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे.
आष्टा येथील उपबाजार आवारात झालेल्या आजच्या सौद्यात झालेला हळदीचा दर नंबर एक हळदीस २१००० ते १८०००, नंबर दोनसाठी १४००० ते १७०००, कणी१२००० ते १३५००, अंगठी गठ्ठा १२००० ते १४१०० तर सोरा २७००० ते २९००० असे दर मिळाले आहेत. आज पासून सुरु झालेले हळद सौदे दर रविवारी नियमितपणे पार पडणार आहेत. तरी शेतकरी बंधूंनी उत्पादित केलेली हळद विक्रीसाठी आणून बाजार समितीस सहकार्य करावे. असे आवाहन यावेळी बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी सांगली येथील मर्दा ऍग्रोचे गोपाळदास मर्दा, अनिश भाई, एम जी पटेल, श्री चौगुले, राज ऍग्रो, धनपाल आवटी व इतर व्यापारी उपस्थित होते. तसेच बाजार समिती सर्व कर्मचारी, आडते, व्यापारी, हमाल व शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





Social Plugin