Ticker

6/recent/ticker-posts

करीम मोईन कादरी उर्फ लाला यांची बहुजन समाज पक्षाच्या भोकरदन शहराध्यक्षपदी निवड



भोकरदन: बहुजन समाज पक्षाने एक महत्त्वपूर्ण घोषणा करत श्री करीम मोईन कादरी उर्फ लाला... यांची भोकरदन शहराध्यक्ष... म्हणून निवड केली आहे. यानिमित्त पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक औपचारिक बैठक आयोजित करण्यात आली.

या महत्त्वाच्या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष मा. अब्दुल रऊफ, जालना जिल्हा अध्यक्ष चंद्रमणी गाडेकर, भोकरदन विधानसभा अध्यक्ष सुखदेव हिवाळे,, दिलीप हिवाळे,, यांच्यासह अनेक मान्यवर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासह संघटन बळकट करण्यावर चर्चा करण्यात आली.

नवनियुक्त शहराध्यक्ष करीम मोईन कादरी उर्फ लाला यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आणि पक्षाच्या तत्त्वज्ञानाला पुढे नेण्याचे वचन दिले. त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडणे, सामाजिक न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करणे आणि पक्षाच्या शाखा मजबूत करणे हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट असेल.

या प्रसंगी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, त्यामध्ये साबिर रियाज शेख,   अन्सार शेख ,रसूल यासीन शेख, बबनराव पाखरे ,पंडित भिका राऊत ,,सद्दामभेद मिर्झा,, सुखलाल बैरी,, शेख लतीफ गुलजार, राजेंद्र कानडजे,, हबाने जिनानिषेक,, रियाज शहा,,, करिम कादरी, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते...!