( दोन हजार रुपयांची लाच घेताना एस बी ने रंगेहात पकडले )
राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : दिग्रस पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पोलिसांनी एका तक्रारदाराकडून दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून भ्रष्ट कर्मचाऱ्यांमध्ये जरब निर्माण झाली आहे. लाटलूच प्रतिबंधक विभाग यवतमाळ कार्यालयत एका 55 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार दिग्रस पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक नारायण धोंडबाजी लोंढे ( वय 54 ) यांनी तक्रारदाराकडून मदत करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन दिग्रस येथे त्यांच्याविरुद्ध एक व दखलपात्र गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात मदत करून कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक लोंढे यांनी तक्रारदाराकडून सुरुवातीला पाच हजार रुपयाची मागणी केली.
पडताळणी दरम्यान तडजोडीअंती लाचेची रक्कम दोन हजार रुपये निश्चित झाली. अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने मंगळवारी सापळा रसून कारवाई आयोजित केली. या कारवाईदरम्यान पोलीस उपनिरीक्षक नारायण लोंढे यांनी दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदाराकडून दोन हजार रुपयाची लाच स्वीकारली. ती रक्कम पोलीस हवालदार दिलीप प्रल्हाद राठोड (वय 41 ) यांच्याकडे सोपवली. लाजलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले. या दोन्ही आरोपी विरुद्ध दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज ओरके, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ हे करीत आहे . ही कारवाई पोलीस अधीक्षक अंटी करप्शन ब्युरो अमरावती परीक्षेत्र अमरावती, मारुती जगताप, आपण पोलीस अधीक्षक,अमरावती, सचिद्र शिंदे आणि पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ, उत्तम नाम वाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस हवालदार अतुल मते, पोलीस नाईक सचिन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, पोलीस कॉन्स्टेबल भागवत पाटील आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल नागमोते यांच्या पथकाने पार पाडली.
( नागरिकांनी निर्भीडपणे पुढे यावे - लाखपुरी हा भ्रष्टाचार असून तो समाजाला लागलेली कीड आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त होतात. आणि शासकीय यंत्रणेवरील विश्वास उडतो आहे. अँटी करप्शन ब्युरो अशा भ्रष्ट कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करीत असून नागरिकांनी देखील भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. आपल्या लहानशा प्रयत्नाने देखील आपण देशाला भ्रष्टाचार मुक्त करू शकतो. अँटिक करप्शन गुरु ही शासकीय कर्मचाऱ्यांमधील भ्रष्टाचाराला आळा घालणारी एक महत्त्वाची संस्था आहे. एसीबी चे पथक धाडस आणि गुप्तपणे कारवाई करून लाखोंना पकडते. नागरिकांनी निर्भीडपणे पुढे यावे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार दाखल करावी असे आवाहन एसीबी तर्फे करण्यात आले आहे.)





Social Plugin