गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा तालुका मधील तांडा, वाडी व वस्तीत लाल मारो लाल रे तांडे माई सुंदरोआयो मारो लाल, अश्या प्रकारच्या पारंपारिक लेंगी गीतांचा आणि डफडीच्या तालावर नृत्य साजरा करून होळी सण बंजारा समाज बांधवानी साजरा केला.
प्रत्येक तांड्यावर शुक्रवारी व शनिवारी होळी व धुळवडीचा मोठा उत्साह पाहावयास मिळाला. होळी हा सण बंजारा समाजाचा अतिशय महत्त्वाचा आणि पारंपारिक पद्धतीने साजरा होणारा सण आहे. या निमीत्ताने होळी आणि धुळवडीच्या दिवशी तांड्याचेनायक, कारभारी, हसाबी, नसाबी आदींनी डफडीच्या तालावर फेर धरुन नृत्य सादर केले. होळीला देव, देविता व संत सेवालाल महाराज, संत रामराव बापू, महानायक वसंतराव नाईक यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकून सामुदायिक नृत्य सादर करत लेंगी गीत गायन करून नागरीक समाज बांधवांनी आनंद लुटला अश्या प्रकारच्या पारंपारिक गीतातून व्यसनाचे महत्त्व सांगून तांड्यावरील महीला, बांधव पारंपारिक वेशभूषेत होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होळी हा सण बंजारा समाजात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्ताने तांड्यावर मोठा उत्साह पाहायला मिळाला. तांडा म्हणजे जणू एक कुटुंब आहे, अश्याप्रकारची एकोप्याची भावना यावर्षी निर्माण झाली होती. सर्व जण एकमेकांच्या सूख दुःखात सहभागी होवून होळी सण साजरा करतांना दिसून आले.





Social Plugin