बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा, कुशल प्रशासक, होते.म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य धर्मनिरपेक्ष होते.असे प्रतिपादन प्रा.प्रकाश जमदाडे यांनी केले.पुसेगाव येथील, कला व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विभाग आणि अग्रणी महाविद्यालय आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.व्यासपीठावर प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, प्रा.डॉ.ए.एस. जगताप,प्रा.डॉ.एन.डी.लोखंडे, प्रा.एल.के.पवार प्रा.के.जी. कुंभार प्रा.एम.एन.आवळे इत्यादी उपस्थित होते.पुढे आपल्या भाषणात प्रा.जमदाडे म्हणाले,'छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य निर्माण केले. मुघल तसेच आदिलशाही, सुलतानी सत्तांच्या विरोधात समर्थपणे उभे राहिले. त्यांच्या असामान्य युद्ध कौशल्य व दूरदृष्टीमुळे, भौगोलिक प्रदेशाचे आणि तेथील दऱ्या खोऱ्यातील सखोल ज्ञानमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली.तिला गनिमा कावा म्हणून ओळखले जाते.ही युद्धनीती अतिशय यशस्वी ठरली.याविषयी माहिती सांगितली.अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.संजय क्षीरसागर म्हणाले ,''शेतकऱ्यांचे हित हेच राज्याची हित हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यकारभाराचे धोरण होते.
या धोरणामुळे त्या काळात दुष्काळ पाणीटंचाई अपुरे सिंचन या समस्या निर्माण झाल्यानंतर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाची इजा पोहोचणार नाही.याची खबरदारी घेतली. याविषयीची अनेक उदाहरणे शिवचरित्रात आपणास सापडतील. लोककल्याणकारी राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होते. याविषयीची माहिती सांगितली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून प्रा.डॉ.ए.एस.जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ ढाल, तलवार आणि लढाया या पुरता मर्यादित नाही तर त्यांनी आपल्या राज्यात सुशासन आणले याविषयीची आपली भूमिका विशद केली. सूत्रसंचालन प्रा. एम. एन आवळे यांनी केले. तर आभार प्रा.के.जी.कुंभार यांनी मानले.कार्यक्रम प्रसंगी कु. नम्रता कदम ,कु. योगिता जाधव या विद्यार्थिनींनी शिवचरित्रावर आपली मनोगत व्यक्त केली. महाविद्यालयातील सर्व कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin