प्रतिनिधी@समाधान भुतेकर ईसरूळ
ईसरूळ ते मलगी आणि बायगाव रस्त्याचे काम तत्काळ सुरु करावे या मागणीसाठी सतीश पाटील सरपंच ईसरूळ तथा सरपंच संघटना चिखली तालुखा अध्यक्ष यांनी आपल्या सहकार्या सह अन्नत्याग अंदोलनाला सुरवात केल्यानंतर गावकरी यांनी सतीश पाटील यांना भरभरून पाठींबा दर्शवीला असता तीन दिवसानंतर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब याच्या साक्षीने अधिकारी वर्गानी मागण्या मंजूर करत उपोषणाची सांगता करण्यात आली. व ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष डांबरीकरणाला सुरुवात झाली
त्यामुळे गावकरी सतीश पाटील याचे विविध माद्यमातून अभिनंदन करीत असतानाच सदर रस्ता हा रेती वाहतुकी मुळे खराब झाला होता तेव्हा परत रेती वाहतूक सुरु झाल्यास किंवा रस्त्याचे काम चालू असतांना रात्री बेरात्री रेतीवाले या रस्त्यावर उतरल्यास रस्त्याची परत पूर्व अवस्था होईल त्यामुळे सतीश पाटील यांनी रेतीवाल्यांना विनंती पूर्वक सूचना विविध माद्यमातून दिल्या आहे तेव्हा रेती वाहतूकदारानी यां रस्त्यावरून रेती वाहतूक करू नये अन्यथा विनंती करूनही भाषा समजत नसेल तर त्याचा करेक्ट कार्यक्रम सुद्धा केला जाईल हे सुद्धा रेतीवाल्यानी लक्षात घ्यावे असे सुद्धा ते म्हणाले.





Social Plugin